याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील शुभम पार्क सहारा टाऊन येथे राहणार्या सचिन भगवान पाटील हे त्यांच्या चारचाकी वाहनाने (क्र.एम.एच. ३९ एडी ११३३) किराणा माल घेवून गुली ओली फाट्याजवळून जात होते.
यावेळी शांताराम कांतीलाल वळवी, नितीन संजय वळवी यांनी चारचाकी वाहनासमोर दुचाकी आडवी लावून वाहन थांबविले. तसेच सचिन पाटील यांना वाहनातून खाली उतरवित वाहनामध्ये विमल गुटखा असल्याचे सांगून वाहन तपासण्याचे सांगून जिवेठार मारण्याची धमकी दिली.
यावेळी सचिन पाटील यांनी वाहनात विमल गुटखा नाही असे सांगितले असता दोघांनी सचिन पाटील यांना वेडापावला गावाजवळ घेऊन जात त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
तसेच सचिन पाटील यांना परत गुली ओली फाट्याजवळ सोडून त्यांचा मोबाईल परत केले. तसेच पप्पू, अंकुश देवानंद वळवी हसन विकास पाडवी, चंदुभैय्या (सोहेल कुरेशी), सचिन ठाकरे व नागो ठाकरे यांनी जबरदस्तीने सचिन पाटील यांचे ७ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन व २० हजार रुपये साखर कट्टे व परिवार तेलाचे डब्बे लूटून नेले.
याबाबत सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात भादंवि कलम ३४१, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील शांताराम वळवी, नितीन वळवी, अंकुश देवानंद वळवी व हसन विकास पाडवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.
0 Comments