Header Ads Widget


नवापूर वनपरीक्षेत्र अंतर्गत नवापूर रस्त्यावरून 57,500 रुपयांचे सागाचे लाकूड वनविभागाच्या कारवाईत जप्त : आरोपीस दोन दिवस वनकोठडी सुनावली.

नंदूरबार ! Nandurbar/LivenationNews

प्रतिनिधी /सईद कुरेशी
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील मौजे किलवनपाडा ते नवापूर रस्त्यावर सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार धनंजय पवार व सहाय्यक वनसंरक्षक परीवीक्षाधिन गणेश मिसाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून नवापूर क्षेत्रपाल स्नेहल अवसरमल व नवापूर पोलीस स्टेशन कर्मचारी नवापूर वनविभाग रेंज स्टॉफ व चिंचपाडा रेंज स्टॉफ
यांनी गस्त घालून सागाचे चौपट चार नग दुचाकी वाहन क्रमांक एम एच 18 एच 9138 यावरून संतोष चंद्रया कोकनी राहणार भवरे यांच्या ताब्यातून एकूण 0.500 सागाचा माल चौपट व त्याच्या ताब्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे वाहन असा ऐकून 57 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल शासकीय वाहनाने नवापूर येथील शासकीय विक्री आगार डेपो येथे जमा करण्यात आला असून, अटकेतील  आरोपीस मे. प्रथम वर्ग न्यायालय नवापूर याचे समोर हजर करने का मी योग्य ती कागदपत्र तयार करून आज दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी आरोपी नामे वसंत चंद्रया कोकणी राहणार भवरे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यास म. प्रथम वर्ग न्यायालय नवापूर येथे हजर केले असता मे. न्यायालयांनी अटकेतील आरोपीस दोन दिवसाची वन कोठडी सुनावली तरी आरोपीस ताब्यात घेऊन वन विश्रामगृह नवापूर येथे कस्टडीत ठेवण्यात आले आहे, सदरची कारवाई वनसंरक्षक धुळे विवेक होशिंग, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा कृष्णा भंवर, सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार धनंजय पवार, नवापूर वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भिवाजी दराडे, वनरक्षक रामदास पावरा, सतीश पदमर, कमलेश वसावे, ईलान गावीत, तुषार नांद्रे, गिरीश वळवी, उदयसिंग पाडवी, बाळा गावित वाहन चालक यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments

|