Header Ads Widget


खांडबारा नियतक्षेत्र राखीव देवमोगरा वनकक्षातून चोरीस गेलेले तारेचे कुंपण चोरणाऱ्यांना अटक व न्यायालयीन कोठडी..

नंदुरबार ! Nandurbar/LivenationNews

प्रतिनधी/सईद कुरेशी 
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या देवमोगरा राखीव वनकक्ष क्रमांक 23 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत 25 हेक्टर नैसर्गिक पुनर्निर्मित क्षेत्राला तारेचे कुंपण करण्यात आले होते, त्यातील काही कुंपन चोरीस गेले असल्याबाबतची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात नवापूर परिक्षेत्र अधिकारी रोजगार हमी योजना स्नेहल अवसरमल यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक देवमोगरा नयना हडस व अरविंद निकम यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी भा.ग. 5 गु.र.नं. 302/2022 भा.द.वि. कलम 379 नुसार तारेची जाळी चोरी संदर्भातला गुन्हा दाखल केला होता, त्यानुसार विसरवाडी स्थानिक पोलिसांनी व वनविभाग स्टॉप नंदुरबार वनक्षेत्र रोजगार हमी योजने यांच्या संयुक्त कारवाईत, गुजरात राज्यातील कुवरसिंग सोनजी वळवी राहणार वडली, तालुका निझर, जिल्हा तापी या आरोपीस मुद्देमालासह पकडले असून, त्यास विचारणा केली असता त्याने वनक्षेत्रातील जाळीचे कुंपण चोरी केल्याबाबत कबुली दिली असून, सदर आरोपीतास नवापूर न्यायालयात हजर केले असता आरोपीतास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली जाळी मुद्देमाल जमा करण्यात आला आहे, याबाबत पुढील तपास नवापूर वनपरिक्षेत्र अधिकारी रोजगार हमी योजना स्नेहल अवसरमल यांच्या मार्गदर्शनाखाली खांडबारा वनपाल करीत असून, सदरची कारवाई रोजगार हमी योजनेच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल वनपाल प्रियंका निकुंबे, वनरक्षक अरविंद निकम, किसन वसावे, नैना हडस, वाहनचालक रवी गिरासे व रोजगार हमी योजनेतील वनपरिक्षेत्रातील सर्व संरक्षण मजूर यांनी या कारवाईत सहभाग घेतला असून, सदरची कारवाई वनसंरक्षक धुळे विवेक होशिंग, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग कृष्णा भंवर, विभागीय वन अधिकारी दक्षता पथक धुळे संजय पाटील व सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून वनक्षेत्रपाल नवापूर व नंदुरबार रोजगार हमी योजना वनविभाग यांच्याकडून जनतेस आवाहन करण्यात आले आहे की वन्य व वन्यजीव तसेच अवैध वाहतूक लाकूड अवैध खोदकाम इतर संबंधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1926 यावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments

|