Header Ads Widget


Lipik Tanklekhak Recruitment लोक आयुक्त कार्यालयामध्ये लिपिक-टंकलेखक भरती सुरू


Lipik-Tanklekhak-recruitment लोक आयुक्त कार्यालयामध्ये पद भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे , सहा महिन्याच्या कालावधीसाठी किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे नियमित उमेदवार प्राप्त होईपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट 

पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरून दिलेल्या पत्त्यावर वेळेत पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी, २०२३ आहे. उमेदवारांनी आपले अर्ज प्रत्यक्ष किंवा रजि.ए. डी./स्पीड पोस्ट मार्फत पाठवायचे आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट 

पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Lipik-Tanklekhak-recruitment लिपिक-टंकलेखक पदासाठी पात्रता:

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.
  • नेमणुकीच्या वेळी उमेदवाराचे वय १९ वर्षांपेक्षा कमी आणि, ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
  • मराठी, हिन्दी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • उमेदवाराने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • टंकलेखन अर्हता: मराठी टंकलेखनाचा वेग ३० श. प्र. मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श. प्र. मि. या अरतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट

 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

मा. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासन भवन,१ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालयासमोर, मुंबई-४०००३२

अर्ज पाठवताना लिफाफ्यावर ‘कंत्राटी तत्वावरील लिपिक-टंकलेखक पदासाठी अर्ज’ असे ठळकपणे नमूद करावे.

अर्जावर अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. अर्जात उमेदवाराचे संपूर्ण नाव, रहिवासी पत्ता, मोबाइल किंवा दूरध्वनि क्रमांक, जन्म दिनांक, नमूद करून अर्ज स्वस्वाक्षरी संहित सादर करावा.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट 

पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments

|