नंदुरबार !Nandurbar/LivenationNews
प्रतिनिधी /सईद कुरेशी
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात घोडजामने वनपरिक्षेत्र हद्दीत परिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल व त्यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून नवापूर ते घोडजामने परिसरात गस्त घालत असताना एक अज्ञात इसम इंजायली जळाऊ लाकडे भरून वाहतूक करत होता सदर आयशर गाडी चा पाठलाग केला असता, आयशर ट्रक चालक थांबवून अज्ञात इसम अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
इंजायली जळावू मालासह आयशर ट्रक क्रमांक एम एच 18 एम 95 32 हे जप्त करून नवापूर विक्री आगार येथे जमा केले. जप्त केलेला इंजायली लाकूड 5.घनमीटर व तपकिरी रंगाचा ट्रक असे मिळून बाजार भावानुसार किंमत चार ते साडेचार लक्ष रुपये एवढी आहे. सदरची कारवाई नवापूर वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल यांच्या समवेत वनरक्षक विकास शिंदे, कमलेश वसावे, व वाहन चालक दिलीप गुरव यांनी केली असून सदरची कारवाई ही धुळे वनसंरक्षक होशींग, नंदुरबार उपवनसंरक्षक कृष्णा भवर, विभागीय वन अधिकारी दक्षता पथक धुळे संजय पाटील व सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून नवापूर वनक्षेत्रपाल वनविभाग यांच्याकडून जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, वन व वन्यजीव तसेच अवैध लाकूड वाहतूक संबंधित कुठलाही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1926 यावर संपर्क साधावा.
नवापूर वनविभाग लाकूड तस्करांवर कारवाई करीत असतांना लाकूड व मुद्देमाल सापडतो परंतु आरोपी का सापडत नाही असा प्रश्न उपस्थित होतो.
0 Comments