प्रिय नागरिक, सध्यास्तिथीला संपूर्ण क्षेत्रात पांढरपेशा फसव्या ( Fraud ) चोरांचे प्रमाण खूप वाढले आहे ज्या प्रकारे नागरिकांना नोकरीच्या नावांवर,दो चाकी, चार चाकी, घरे, दुकान गहाण ठेवणे अशे आमिष दाखवून हे पांढरपेशा चोर वेगवेगळ्या कामाच्या नावाखाली सामान्य नागरिक व अशिक्षित लुटले जात आहे. सामान्य नागरिक गरजेपोटी अशा चोर भामट्यांच्या संपर्कात येतात. याचे प्रणाम जे प्रामाणिकपणे काम करतात किंवा ज्यांना खरेच पैशांची गरज आहे असे लोकांना वंचित होऊन भोगावे लागत आहे.
आपल्यासमोर खूप लहान/मोठे अशी घटना निदर्शनात येत आहे. कोणी घरकुल च्या नावावर, कोणी रेशन कार्डचे नावावर, कोणी सरकारी फाईल पुढे पाठवण्याचे नावावर, किंवा बचत गट प्रायव्हेट बँक कर्ज योजना चे नावावर, अनेक घटना अलीकडच्या काळात तुमच्यासमोर आले असतील. असे वेगवेगळे कामाचे नागरिकांना आमिष दाखवून पैशांची वसुली व फसवणूक केली जात आहे. नंतर नागरिकांना अशा लोकांना विना शहानिशा करून कागदपत्रे द्यावे लागतात.
मग त्यांच्या असहायतेच्या फायदा घेत पांढरपेशा चोर त्यांचे सर्व पैसे गिळंकृत करून पचवता. कोणत्याही पुराव्या किंवा कागदपत्र अभावी हे लोकांचे विरुद्ध कोणतेही ठोस पाऊल सामान्य नागरिक उचलू शकत नाही. त्यामुळे हे लोक दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे व त्यांची संख्या वाढतांना दिसत आहे. स्थानिक प्रशासनाने असे पंढर्यापेशा चोर भामट्यांना शिरकाऊ करू न देणे व सामान्य नागरीकांना फसव्या पासून वाचवावे. अशा पांढर्यापेशा चोरांवर पोलिसांद्वारे कठोर कारवाई झालीच पाहिजे. अशी मांगणी Live Nation News परिवाराच्या माध्यमातने केली जात आहे.
अडला हरी गाढवाचे पाय धरी
आणि अश्या चोर भामट्यांना पोलीस केव्हा धरील
असे सामान्य नागरिकांकडून प्रश्न उपस्तीत होत आहे.
सतर्क रहा सुरक्षित रहा
( टीप : कोणत्याही अनोळखी व्यक्ती सोबत पुराव्याशिवाय किंवा कोणत्याही कायदेशीर कागदपत्र शिवाय व्यवहार करू नका व आमहिषाला बळी पडू नका. )
0 Comments