Header Ads Widget


मिसेस एशिया युनिव्हर्स अंजली कोला पोर्जे अर्बन फेस्ट इंडियाज ग्लॅमर पुरस्काराने सन्मानित...

औरंगाबाद/Aurangabad/ LivenationNews 

प्रतिनिधी /रतन बी. राऊत   

गुजरात मधील सुरत शहरात आयोजित अर्बन बेस्ट इंडियाज अवार्ड कार्यक्रमात मिसेस एशिया युनिव्हर्स सुप्रसिद्ध मॉडेल अंजली कोला पोर्जे यांना नुकतेच सिने अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा समजला जाणारा अर्बन बेस्ट इंडियाज ग्लॅमर अवार्ड 2023 ने सन्मानित करण्यात आले.                              
ग्लॅमर व मॉडलिंग क्षेत्रात गेल्या बारा वर्षापासून अंजली कोला पोर्जे या आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे, आतापर्यंत त्यांनी अनेक फॅशन शो मध्ये सहभाग घेतला आतापर्यंत त्यांना या क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. 

अंजली कोला पोर्जे यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण करू इच्छित असणाऱ्या नवतरुण तरुणीसाठी अनेक शहरात मॉडलिंग फॅशन शो चे यशस्वी आयोजन केले आहे, तसेच त्यांचे या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य बघता देशभरात अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा (एफ एन एक्स) इंडिया तर्फे दिला जाणारा अर्बन फेस्ट इंडियाज ग्लॅमर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. या अवार्ड सोहळ्यामध्ये सिने अभिनेत्री अमिषा पटेल बॉलीवुड एक्टर आणि सेलिब्रिटी अँकर अमन वर्मा डीआयडी फेम सलमान खान वो सीनेसृष्टीतील ग्लॅमर दुनियेतील  अनेक मान्यवर सेलिब्रिटी उपस्थित होते. या पुरस्कार मिळाल्याबद्दल अंजली कोला पोर्जे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Saturday, April 12. | 6:25:52 PM