Header Ads Widget


लोकल ट्रेनमधून ओढत बेदम मारहाण केल्याने ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तिघांविरोधात गुन्हा दाखल

 Thane ! ठाणे/LiveNationNews

एका ४३ वर्षीय व्यक्तीला लोकल ट्रेनमधून ओढून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Man Beaten To Death at Mumbra Station : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एका ४३ वर्षीय व्यक्तीला लोकल ट्रेनमधून ओढून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. कमालउद्दीन अन्सार शेख असं या व्यक्तीचं नाव असून असून या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमालउद्दीन अन्सार शेख हा अंबरनाथ येथील रहिवासी असून तो १ जानेवारी रोजी लोकल ट्रेनने आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. मुंब्रा येथे पोहोचताच तीन अज्ञात व्यक्तींनी त्याला ट्रेनमधून खाली ओढले. तसेच त्याला बेदम मारहाण केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कमालउद्दीनला रुग्णालयात दाखल केले. मात्र, ४ जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments

|