Header Ads Widget


नंदुरबार तालुक्यातील आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत वाघाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी कला व क्रीडा महोत्सव आयोजन.

ग्राउंड रिपोर्ट : सईद कुरेशी - सह संपादक

मौजे वाघाळे ता.जि. नंदुरबार येथे आदिवासी समाजातील विद्यार्थी युवावर्ग कलावंत खेळाडू यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना अविष्कार करण्याची संधी मिळावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्दंत हेतूने 'आदिवासी कला व क्रीडा महोत्सवाचे' 27, 28 व 29 जानेवारी 2023 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनात मुख्यत: लेखन स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा, चित्रकला, फोटोग्राफी, गीत गायन ,नृत्य स्पर्धा, लोकसंगीत, सोंग स्पर्धा, धावणे ,मॅरेथॉन, रस्सीखेच ,दोरी- उडी, बुद्धिबळ ,कबड्डी ,हॉलीबॉल, चाचणी स्पर्धा परीक्षा, चित्रकला प्रदर्शन, फोटो प्रदर्शन स्पर्धा व आदि आयोजित करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सुप्रिया गावित जि. प. अध्यक्षा नंदुरबार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान यांच्या आयोजन चे कौतुक केले. अशा विविध वक्तृत्व स्पर्धा घेतल्याने जनजागृती होईल. 
कारण आपले काही लोक आपली संस्कृती विसरत चाललेले आहेत आपले भाषा राहणीमान पोशाख विसरत आहेत आणि आपण यांच्यावर एक जनजागृती म्हणून, अशा स्पर्धा आयोजन करणे ही एक जनजागृतीच आहे. पुढे बोलताना म्हणाले की आदिवासी समाजाचे खेळाडूंमध्ये जो नैसर्गिक स्टॅमिना आहे. 
तो इतर दुसऱ्या व्यक्तीमध्ये नसेल कारण आपला समाज जल जंगल जमीन नेहमी निसर्गाच्या सानिध्यात राहत असून, लहानपणापासूनच स्ट्रॉंग , मजबूतपणा आपल्या अंगी असतो. आपण निसर्गाला पुजणारे आदिवासी आपण मागे न राहता सर्वांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तालुका स्तरावर, जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर व नॅशनल स्तरावर मागे न राहता सर्वांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या समाजाचे व वैयक्तिक सर्वांगीण विकास व नावलौकिक करावे. 
महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय शाळांवर मुख्य चेहरा दिसणारा (फेस आयडी) मशीन बसवणार असल्याचे सांगितले विविध कार्यालय, शाळा, वस्तीगृह अशा अनेक ठिकाणी ही मशीन बसवणार असल्याचे सांगितले. तसेच विविध योजना अंतर्गत सामाजिक सभागृह, शाळा, आरोग्य,क्रीडांगणे, सांस्कृतिक साहित्य, वेशभूषा विविध योजना आपल्या विकास निधीतून उपलब्ध करून दिले जाईल.आदिवासी समाज, शिक्षण, खेळ ,रोजगार, आरोग्य व इतर शासकीय योजनांपासून पुरेपूर लाभ दिला जाईल असे आश्वासित केले आहे. 
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. ना. डॉ.विजयकुमार गावित (आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार, महाराष्ट्र राज्य), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बापूसाहेब चौरे, प्रमुख पाहुणे मा. डॉ. सुप्रिया गावित (जि.प. अध्यक्षा नंदुरबार), मा. आ. शिरीष नाईक (नवापूर विधानसभा), मा.मायाताई मालचे ( सभापती, पंचायत समिती नंदुरबार), मा. सुषमाताई प्रवीण पवार (लोकनियुक्त सरपंच वाघाळे), मा. देवमन पवार ( जि. प. सदस्य नंदुरबार), मा.संतोष साबळे (सदस्य पंचायत समिती नंदुरबार), मा.गणेश चौरे (उपसरपंच ग्रामपंचायत वाघाळे), मा. लोटण बाविस्कर (मुख्याध्यापक जि. प. वाघाळे) व सर्व परिसरातील ग्रामस्थ महिला युवा व खेळ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|