Header Ads Widget


नवापूर तालुक्यातील बोरविहीर ते बारी रस्त्याने गस्तीवर असतांना वन विभागाने 50हजार किमतीचे सागवान लाकूड केले जप्त

शिरावर साग लाकूड असता गस्ती पथकाला पाहताच तस्कर अंधाराचा फायदा घेत पसार
दिनांक 26 जानेवारी 2023 वार गुरूवार रोजी रात्रीच्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीनूसार  वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक व वन्यजीव,वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक यांच्यासह शासकीय वाहनाने बोरविहीर ते बारी रस्त्याने पेट्रोलिंग करताना अज्ञात इसम शिर ओझ्याने लाकडे वाहतूक करताना दिसले. शासकीय वाहन दिसताच सदर इसमानी शिर ओझे फेकून अंधाऱ्याचा फायदा घेऊन पसार झाले तरी सदरची साग चौरस लाकडे जप्त करून शासकीय वाहनात भरून      शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून  पावतीने जमा  केले.जप्त माल साग चौरस नग 07 घन मीटर 0.340  या मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत 40 ते 50 हजार  रूपये एवढी आहे.

सदर कार्यवाहीत  माननीय स्नेहल अवसरमल वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक, भिवाजी दराडे वनपाल खेकडा, वनरक्षक कल्पेश अहिरे, संतोष गायकवाड, उदयसिंग पाडवी , गिरीश वळवी  यांनी सहभाग घेतला.

सदर कार्यवाही  विवेक हौसिंग साहेब वनसंरक्षक धुळे ,श्री. कृष्णा भवर उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार , संजय पाटील  विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे,माननीय धनंजय ग.पवार सहाय्यक वन संरक्षण प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .
वनक्षेत्रपाल नवापुर प्रादेशिक नंदुरबार वनविभाग नंदुरबार  यांच्या कडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा.

Post a Comment

0 Comments

|