Header Ads Widget


नासिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदारांनी आपल्या मतदानाच्या हक्क बजावला.

नंदुरबार ! LiveNationNews Bulletin

विधानपरिषदेच्या पाच जागांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली आणि सगळ्याचं लक्ष असलेली निवडणूक म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघ. 


नासिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदारांनी आपल्या मतदानाच्या हक्क बजावला.

नाशिक पदवीधर मतदार संघाकरिता नंदुरबार जिल्ह्यातील 23 मतदान केंद्रातून 9 हजार 385 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क वाजवला 49.61% मतदान झाले.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघासाठी आज मतदान झाले असून. नंदुरबार जिल्ह्यात 23 मतदान केंद्रांवर 49.61% मतदान झाले असून, त्यात 9, 385 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजविला.

नंदुरबार जिल्ह्यात एकूण 18 हजार 918 मतदार असून, त्यात पुरुष 13,146 तर 5,770 स्त्रिया असे एकूण 18 हजार 918 मतदार होते, त्यापैकी 7,080 पुरुष तर 2,305 स्त्रियांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री के.सी पाडवी खासदार हिना गावित व अनेक नेते मंडळी यांनी आपल्या मतदानाच्या हक्क बजावला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या पाठिंबाच्या वर उभा असलेल्या शुभांगी पाटील यांच्यात महत्त्वाची लढत दिसून आली.

16 उमेदवार असल्याने मतपत्रिका आहे सुशिक्षित मतदार असल्याने बेरोजगारीची समस्या सोडवावी, उद्योग वाढावे, अशी अपेक्षा मतदारराजा व्यक्त करत होते.

नंदुरबार जिल्ह्यात एकूण 9,385 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे, नंदुरबार जिल्ह्यात नासिक पदवीधर मतदारसंघासाठी 49.61% एवढे मतदान झाले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी यांनी आपली मोठी भूमिका राबवली आहे

Post a Comment

0 Comments

|