खांडबारा! Khandbara/LivenationNews
प्रतिनिधी : उत्तम गावित - नवापूर तालुक्यातील खांडबारा ॲग्री हायस्कूल जुनियर कॉलेज जवळ लक्ष्य बहुउद्देशीय संस्था करंजाळी तालुका नवापूर यांच्या अंतर्गत एस.पी अभ्यासिका खांबाला येथे सुरू करण्यात आली आहे.
उद्घाटन रविवार 29-1-2023 रोजी सकाळी 10-30 वाजता करण्यात आले एस.पी.अभ्यासिका चे उद्घाटन खांडबारा येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री अविनाश गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
एस.पी अभ्यासिकाचे उद्देश खांडबारा परिसरातील ग्रामीण भागात असलेल्या मुलांना आपल्या अंगी असलेले कला गुण विकास करणे व अभ्यासाची तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व्हावे आणि आपल्या भागातील मुली आणि मुले यांचा विकास व्हावा ,यासाठी एसपी अभ्यासिका सुरू करण्यात आला आहे.
याप्रसंगी खांडबारा ग्रामपंचायत चे प्रथम लोक नियुक्त सरपंच अविनाश भाऊ गावित ग्रामपंचायत सदस्य ॲड. तारकेश्वरी नाईक, करंजाळी ग्रामपंचायत सदस्य विनायक गावित तसेच योगेश गावित, राजेंद्र गावित, डॉ.संदीप पाडवी, मनोज शर्मा ,सुनील गावित, खांडबारा लक्ष्य संस्थांचे सचिव उत्तम गोविंद गावित ,उपाध्यक्ष अभिजित वळवी सदस्य सुनील गावित, शांतू कोकणी, राकेश गावित, विश्वास गावित आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments