अक्कलकुवा ! Akkalkuwa/LivenationNews
प्रतिनिधी/ अल्ताफ मलकानी
अक्कलकुवा तालुक्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली आहे.३१ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकी नंतर आज सोमवारी (ता.०९) उपसरपंच पदाची दुसऱ्या टप्प्याची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.यात खापरसह आठ ग्रामपंचायतील उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली.सकाळी १० ते १२ च्या दरम्यान सबका साथ सबका विकास पेनेलचे कामे विनोद व ग्रामविकास परिवर्तन पेनेलचे जाट ललित यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र ललित जात यांनी दुपारी पावणे दोन वाजेच्या दरम्यान अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध ठरली.
निवडणूक निरीक्षक म्हणून मंडळ कृषी अधिकारी मुकुंद बोराटे व सचिव ग्रामविकास अधिकारी विनोद ढोढरे यांनी काम पाहिले.
खापर गावातील ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी सबका साथ सबका विकास पेनेलचे कामे विनोद यशवंत यांची बिनविरोध निवड झाली.ग्रामपंचायत निवडणूक वर्ष २०२२ ते २०२७ यासाठी झाली.यावेळी तत्कालीन लोकनियुक्त सरपंच किरण पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. या पॅनलने लोकनियुक्त सरपंचासह अकरा जागा मिळवल्याने उपसरपंच याच पेनेलचा होणार हे अगोदरच निश्चित झाले होते.यावेळी सबका साथ सबका विकास पेनेलचे सर्व सदस्य,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
खापर ग्रामपंचायतीत सन १९९२ ते २०२२ या ३० वर्षाच्या कालावधीत प्रथमच उपसरपंच पदाची जबाबदारी दुसऱ्यांदा मिळाली आहे.गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत केलेल्या कामाची दखल खापर गावांतील जनतेने घेऊन आम्हाला मिळालेली मते आमच्या कामाची प्रचीती आहे.पुन्हा बहुमताने निवडून ग्रामपंचायतीत विराजमान केल्यास खापरच्या जनतेचे आभार प्रकट करतो व येत्याकाळात गावांच्या विकासासाठी बांधील आहे अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच यांनी निवडी नंतर दिली.
चौकट-खापर गावांतील जनतेने २५२४ मताधिक्याने निवडून दिले आहे,विरोधी उमेदवारांपेक्षा ६०६ मतांनी विजयी झालो.वर्षानुवर्षे जनतेच्या सेवेसाठी झटत असल्याचे फळ जनतेने मतदानाच्या स्वरूपात दिले.गावांचा सर्वांगीण विकास हा एकमात्र उद्देश आहे,जनसेवेसाठी नेहमी तत्पर राहील.लोकनियुक्त सरपंच पदी निवडून आल्याने गावांतील जनतेत कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता प्रांजळ मनाने कामे करेन.
किरण पाडवी
लोकनियुक्त सरपंच, खापर
यांनी खापर ग्रामस्थांना आश्वासित केले आहे.
0 Comments