Header Ads Widget


साक्री तालुक्यातील शेवाळीचे भूमिपुत्र गंगाधर नांद्रे आबासाहेब जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत..



साक्री ! Sakri/LivenationNews

प्रतिनिधी/ अकील शहा





    साक्री तालुक्यातील शेवाळी(दा) जि. धुळे येथील शिक्षक श्री गंगाधर यशवंत नांद्रे जोगेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री वाय. एफ. ठाकरे माध्यमिक विद्यालय वाघम्बा येथे 25 वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य उत्कृष्टपणे करत असून शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय, शिक्षक म्हणून ओळखले जातात म्हणूनच त्यांची आबासाहेब जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आणि आपल्या देशाचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ.सुभाषजी भामरे ,धुळे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती जीभाऊसो.हर्षवर्धनजी दहिते,सुरेशजी निकम, अध्यक्षा अक्कासाहेब ठाकरे,नंदलालजी ठाकरे यांच्या हस्ते दि 9 जानेवारी 2022 रोजी प्रदान करण्यात आला.

जोगेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे संस्कारशील विद्यार्थी घडवणारी पाठशाळा असून कै.आबासाहेब दिलीपजी ठाकरे यांनी हे पुण्याचे कार्य सुरू केले होते असे गौरवोद्गार डॉ.भामरे यांनी काढले.एका शेतकरी कुटुंबातील नांद्रे याना लहाणपणापासूच परिवारात कष्टाचे आणि शिस्तीचे बाळकडू मिळाले होते,

गावातील विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग असतो. एक नाट्यकलावंत म्हणून त्याची ओळख आहे  सासुरवास ,एकच प्याला अशी नाटक त्यांनी गाजवलेली आहेत आणि ह्या कलेचा उपयोग ते आपल्या विद्यार्थ्यासाठी करतात.श्री नांद्रे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शेवाळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

Post a Comment

0 Comments

Today is Wednesday, April 23. | 8:51:24 PM