वीज वितरण कंपनीच्या प्रस्तावित वीज दरवाढीला हरकती कशा नोंदवाव्यात!
suggestions.mtr2022@mahadiscom.in
विषय: प्रस्तावित वीज दरवाढीला विरोध नोंदवीत आहे.
महोदय,
उपरोक्त विषयान्वये कळवतो की, वीज वितरण कंपनीने केलेल्या प्रस्तावीत दरवाढीवर मा. आयोगाने दिनांक 15/02/2023 पर्यंत हरकती मागविल्या आहेत, यानुसार मी या दरवाढीला कडाडून विरोध करत आहे,
विरोधाची कारणे पुढीप्रमाणे,
फक्त वीज दरवाढ करणे हा पर्याय नसून, विजेची अंतर्गत गळती कमी करणे, थकबाकीची वसुली करण्यासाठी प्रयत्न करणे, अवाजवी खर्च कमी करणे, कामाचे योग्य नियोजन करणे, भ्रष्टाचार कमी करणे, कर्मचाऱ्यांची स्पर्धात्मता मानसिकता तयार करणे आवश्यक आहे.
हे सगळे न करता अवाजवी दरवाढ प्रस्तावीत केली आहे, शेजाराच्या राज्यात वीज स्वस्त आहे, कंपनीने योग्य नियोजन केल्यास दरवाढ करायची गरज भासणार नाही. सबब ही दरवाढ फेटाळावी व योग्य नियोजन करण्याचे आदेश कंपनीला द्यावेत अशी आपल्याला विनंती करीत आहे.
आपला विश्वासू,
(नाव, मो. न, ईमेल, संपूर्ण पत्ता लिहावा)
____________________________________
मित्रांनो,
महावितरण कंपनीने या जाहिर सूचनेव्दारे उक्त याचिके संदर्भात जनतेकडून सूचना / हरकती मागवाव्यात, असे मा. आयोगाचे निर्देश आहेत. जनतेने आपल्या सूचना / हरकती इंग्रजी व मराठी भाषेत लेखी स्वरूपात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांच्या वेब प्रणालीवर E-Public-consultation टॅबवर जाऊन (www.merc.gov.in/e-public- consultation) नोंदवाव्यात. या संबंधी काही तक्रार असल्यास मोबाईल नं.८९२८०७१५२२ अथवा ई-मेल :- suggestions@merc.gov.in वर सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०५.०० या कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.
ज्या व्यक्तिने वेब प्रणालीवर E-Public-consultation टॅबवर जाऊन आपल्या सुचना व हरकती लेखी स्वरुपात नोंदविल्या आहेत त्यांनी सदर सूचना व हरकती प्रत्यक्ष लेखी स्वरुपात (hard copy ) देण्याची आवश्यकता नाही. तथापि, ऑनलाईन वेब प्रणालीवर नोंद न करु शकलेल्या व्यक्तिने सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, १३ वा मजला, केंद्र क्र. १, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-४००००५ या पत्त्यावर प्रत्यक्ष लेखी स्वरुपात (hard copy) सुचना व हरकती पाठवाव्यात.
या सोबत सूचना / हरकती याची एक प्रत अधिक्षक अभियंता ( वीजदर नियामक कक्ष), प्लॉट नं. जी-९, ५वा मजला, प्रकाशगड, प्रोफेसर अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०००५१, ई-मेल : suggestions.mtr2022@mahadiscom.in यांना पाठविल्याचा पुरावा जोडण्यात यावा. तसेच सूचना / हरकती दाखल करु इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीने त्यावर प्रेषकाचे संपूर्ण नाव, टपालाचा पत्ता, असल्यास ई-मेल पत्ता नोंद करावा. एखाद्या ग्राहक संघटनेच्यावतीने अथवा ग्राहक वर्गवारीच्यावतीने हरकती दाखल करण्यात येत असल्यास तसे स्पष्ट नमूद करावे. दि. १५ फेब्रुवारी, २०२३ सायंकाळी ५.०० नंतर दाखल केलेल्या सुचना व हरकती ग्राहय धरण्यात येणार नाहीत. तसेच इतर कोणत्याही पद्धतीने दाखल केलेल्या सुचना / हरकती ग्राहय धरण्यात येणार नाहीत.
दिनांक १५ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत प्राप्त झालेल्या प्रत्येक सूचना / हरकती यांना महावितरण कडून तीन दिवसात परंतु दिनांक १८ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत उत्तरे देण्यात येतील. महावितरणतर्फे देण्यात आलेल्या उत्तरावर हरकतदार / सुचनाकार त्यांची प्रतिप्रश्न किंवा उत्तरे जाहिर सुनावणीच्यावेळी किंवा उशिरात उशिरा दिनांक ०६ मार्च, २०२३ पर्यंत दाखल करु शकतात.
ज्या हरकतदार किंवा सूचनाकारांनी वर नमुद केल्यानुसार आपल्या सूचना / हरकती दाखल केल्या आहेत व तसेच वरील हरकतदारांना किंवा सूचनाकारांना ई- सुनावणी वेळेस प्रत्यक्ष हजर रहावयाचे असल्यास त्यांनी सूचना व हरकती मांडताना कुठे हजर राहणार त्या ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख करावा. अशा परिस्थितीत, आपला भ्रमणध्वनी क्रमांक व वैध ई-मेल आयडी याची माहिती देणे बंधनकारक राहिल.
ई- सुनावणीमधे भाग घेणाऱ्यांनी मा. आयोगाने दिनांक १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी निर्गमित केलेल्या "operational procedure and protocol to be followed for e-hearing of the petition before the commission" या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. तसेच, ज्या हरकतदारांना किंवा सूचनाकारांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ई- सुनावणीमधे भाग घेणे शक्य नाही, त्यांनी खालील तक्त्यातील ई-सुविधा केंद्रामध्ये हजर राहून ई-सूनावणीमध्ये सहभागी व्हावे.
0 Comments