Header Ads Widget


सुळी येथील मुख्याध्यापकास विद्यार्थ्याकडून मार्कशीट देण्यासाठी सोळाशे रुपयाची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.


नंदूरबार !Nandurbar/LivenationNews 


नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सुळी येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदावर असलेले नंदलाल शांताराम शिनकर यांनी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील नावाची दुरुस्ती करणे तसेच विद्यार्थ्याचे दहावीचे मार्कशीट घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सोळाशे रुपयाची लाच घेताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सुळी येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले नंदलाल शांताराम शिनकर यांच्याकडे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील तक्रारदार विद्यार्थी यांनी सन 2017 18 या वर्षी नवापूर तालुक्यातील सुळी येथील माध्यमिक विद्यालयात दहावीचे शिक्षण घेतले असून, त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट घेण्यासाठी मुख्याध्यापकांकडे तक्रारदार विद्यार्थ्याने विनंती केली, यावेळी मुख्याध्यापकांनी संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याकडून शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील आईचे नाव दुरुस्त करून घेणे व नाशिक येथील बोर्ड कार्यालयातून त्यांचे मार्कलिस्ट आणून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तदनंतर

 

आज दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस हवालदार विजय ठाकरे, अमोल मराठे, पोलीस नायक देवराम गावित यांनी लाच लचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन एस न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याकडून सोळाशे रुपयाची लाच स्वीकारताना सुळी येथील मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर यांना लाच स्वीकारताना पकडण्यात आले असून, नवापूर पोलीस स्टेशन येथे संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्याकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

|