Header Ads Widget


अल्पसंख्यांक विकास मंडळच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी, डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांची सर्वानुमते निवड...



नाशिक! Nashik/ LivenationNews

सर्व सामान्य गोर - गरिब माणसांच्या न्याय व हक्कासाठी एकमेव लढा.. ( एक सोच समाज के विकास के लिये), सामान्य माणसाचा बुलंद, आवाज,  अल्पसंख्यांक विकास मंडळ, महाराष्ट्र राज्य, च्या,  नाशिक जिल्हा ( ग्रामीन ) जिल्हाध्यक्ष पदी, येवला येथील, आदर्श महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते,कौमे - खिदमत सोशल फाउंडेशनचे, संस्थापक अध्यक्ष जनसेवक, समाज रक्षक कार्यसम्राट.. 


मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन,यांची  एका आयोजित राज्यस्तरीय मेळाव्या प्रसंगी, संघटनेचे संस्थापक व. प्रदेशाध्यक्ष शोएब आसिफ खाटीक, यांनी निवडीचे नियुक्तीपत्र विविध मान्यवरांच्या उपस्थित दिले आहे.
सदर संघटनेचे ध्येय - धोरण समाजापर्यंत पोचविण्याचे कार्य आपण सक्षम पणे कराल व समाजाला शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या सांस्कृतिक वैद्यकीय कृषी क्रीडा नवयुवक तसेच महिला बालकल्याण विविध क्षेत्रांमध्ये शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी कामांमध्ये आघाडी घेऊन समाजाचा विकास करण्यासाठी सर्वसामान्य गोरगरिबांची अडीअडचणी भारतीय संविधान कायद्याप्रमाणे राज्यघटनेच्या आधारे संघटनेला बळकटी देण्यासाठी आपण जोमाने काम कराल असे नियुक्ती पत्रा मध्ये  नमूद केलेले आहे, ( वार्डा तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता,  ) सर्व धर्म समभाव, जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, मानवता, भाईचारा जोडो संकल्प अभियान,  सदस्य महा नोंदणी अभियान, मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी, संघटनेच्या व समाजातील सर्व घटकातील नवतरुणांना  युवकांना   बेरोजगारांना सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची संधी आपणास उपलब्ध करून दिलेली आहेत असे,  निवडीच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे .



सदर निवडीबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments

|