Shahada ! शहादा/LiveNationNews
शहादा प्रतिनिधी : मुजाहिद शेख
शहादा बीटस्तरीय क्रीडा व बौद्धिक स्पर्धा ( केंद्र- पाडळदा , परीवर्धा , शिरुड दिगर ) यांची संयुक्त विद्यमाने बीटस्तरावर बीट शहादा नं. १ अंतर्गत गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विदयालय परीवर्धा येथे क्रीडा व बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा पंचायत समिती सभापती विरसिंगदादा ठाकरे यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा, क्रांतिवीर खाज्या नाईक, वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थिती जि.प. नंदुरबार सदस्य मोहनदादा शेवाळे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, शहादा पंचायत समिती सदस्य सुदामभाई पटेल, गणेशभाई पं.स.सदस्य, डॉ. सुरेश नाईक माजी सभापती पं.स. शहादा, गटशिक्षणाधिकारी धिरसिंग वळवी, परीवर्धा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. पाटील, मनिलाल शिंपी (आर. एस. पी.) अधिकारी कल्याण, किशोर अढळकर, युवराज मोरे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाशा, केंद्रप्रमुख-एस. एस. अहिरे, ममता पटेल शिक्षण विस्तार अधिकारी बीट शहादा, शहादा बीटातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. एकूण ७५ प्रकारच्या क्रीडा व बौद्धिक स्पर्धेसाठी बिटमधील तिन्ही केंद्रातून ८५० विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. बीटमधील एकूण १२० शिक्षकांनी यासाठी सहकार्य केले. स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी धिरसिंग वळवी यांच्या हस्ते मशाल पेटवून व फित कापुन करण्यात आले. सोबत विद्यार्थी संचलन झाले तसेच बौद्धिक स्पर्धेची सुरूवात ही फित कापून जिल्हा परिषद सदस्य मोहनदादा शेवाळे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे खास वैशिष्ठ्य म्हणजे एकाच वेळी या ७५ प्रकारच्या क्रीडा व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य मोहनदादा शेवाळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुप्त गुणांना वाव देण्यासाठी खेळाच्या स्पर्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून नियोजन करून स्पर्धा आयोजित केल्या तरच विद्यार्थी जिल्ह्याचे नाव राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय विविध खेळात जिल्ह्याचे नाव रोशन करतील असेही मत व्यक्त केले. दुपारच्या सत्रात स्वादिष्ट भोजन देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्र विवरण कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षण दर्शन स्पर्धा महोत्सव साजरा करण्यात आला. बीटातील ३९ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. माध्यमिक विद्यालय परिवर्दे येथे एकूण विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .त्या स्पर्धेमध्ये विविध समित्यांचे गठन करण्यात आले होते. यात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खो- खो ,कबड्डी ,भालाफेक ,लांब उडी १०० मीटर धावणे, लिंबू चमचा शर्यत, गोंडपाठ शर्यत. गायन ,चित्रकला, कागदकाम, श्रुतलेखन ,अनुलेखन इत्यादी स्पर्धा तीन गटात विभागून घेण्यात आल्या. सांघिक व वैयक्तिक खेळात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी श्री. राघवेंद्रजी घोरपडे यांनी आपल्या मनोगतात, खेळाकडून अभ्यासाकडे कसे जाता येईल व गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं घेता येईल यावर मार्गदर्शन केले. ह्या स्पर्धेसाठी ममता पटेल यांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेत खेळ आणि शैक्षणिक गुणवत्ता याचा समावेश केला होता. परिसरातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी आपली गुणवत्ता दाखविण्याची सुवर्णसंधी यातून त्यांनी मिळवून दिली. साधारण १२०० विद्यार्थी आणि २०० शिक्षकांचे हे आयोजन उल्लेखनीय असे म्हणावे लागेल. ममता पटेल शिक्षण विस्तार अधिकारी बीट शहादा नं.१ यांच्या सहकार्याने केंद्रप्रमुख एस. एन.चौधरी, रविंद्र लामगे यांच्यासोबत केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. स्पर्धेमुळे संपूर्ण बीटातील विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण झाला सर्व शिक्षक पालकांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत आहेत अशा स्पर्धा आयोजक ममता पटेल यांनी भविष्यातही अशाच कार्यक्रमाचे नियोजन करावे अशी भावना प्रत्येक शिक्षकांच्या मनामनात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयवंत जोशी यांनी केले. बक्षिस वितरणाचे प्रास्ताविक अमोल शिंदे यांनी तर उपस्थितांचे आभार रतिलाल सामुद्रे यांनी मानले.
0 Comments