Header Ads Widget


झोमॅटो किंवा इ कोमर्स वरून काही मागावलेत तर डिलिव्हरी बॉईजच्या दोड्यात बघा ..😢

झोमॅटोवरून काही मागवलेत तर जो डिलिव्हरी बॉय येईल त्याच्या दोन डोळ्यात झोमॅटोच्या सीईओना दिला जाणाऱ्या २,००,००,००० (दोन कोटी) वार्षिक पगारावरची शून्ये दिसतात का बघा ! 

(फक्त झोमॅटोच नाही तर इ कॉमर्स वरून काहीही मागवलेत तरी डिलिव्हरी बॉईजच्या डोळ्यात बघा )

आपण एकविसाव्या शतकात जगत असू पण सर्व प्रकारच्या डिलिव्हरी बॉईज साठी हे ब्रिटनमधील औद्योगिक क्रांती सुरु झालेले अठरावे शकत आहे 

कोणत्याही प्रकारचे किमान वेतन नाही ; जितक्या डिलिव्हरी करणार त्या प्रमाणात एका डिलिव्हरी मागे पैसे मिळणार , त्यामुळे जास्त पैसे मिळवण्यासाठी दिवसाला १२ ते १५ तास काम , छोट्या मोठया शहरात रस्त्यावरील गर्दी , दूषित हवा घेत दुचाकीवरून फिरणे , जड वस्तू घेऊन जिने चढणे , कोणतीही वैद्यकीय सेवा किंवा वेतनापलीकडील सुविधा नाहीत , स्वतःचे इंधन , स्वतःचे मेंटेनन्स खर्च ; जॉब सिक्युरिटी नाही ; डिलिव्हरी करतांना अपघात झाला , जायबंदी झाला तर आउट ऑफ गेम ; 

श्रम विकणाऱ्यासाठी जे जे काही निगेटिव्ह असू शकते ते सर्व त्यांच्या वाट्याला आले आहे ; ट्रेड युनियन करण्याचे नाव जरी काढले तरी कामावरून काढण्याची दहशत 

हे डिलिव्हरी बॉईज सगळे वयाने तरुण आहेत ; काय असणार आहे यांची आयुर्मर्यादा ? उत्पादक आयुर्मर्यादा ? चुरगळून फेकून दिले जाईल त्यांना आणि क्यू मधील पुढचा तरुण त्याची जागा घेईल !

झोमॅटो , स्विगी , फ्लिपकार्ट , अमेझॉन , बिग बास्केट आणि अनेकानेक इ कॉमर्स / फूड डिलिव्हरी कंपन्या वेगाने वाढत आहेत .

इ कॉमर्स कंपनी मध्ये समजा १०० जण काम करीत असतील तर त्या १०० पैकी ९० ते ९५ व्यक्ती या डिलिव्हरी बॉईज असतात ; पण त्यांना कंपनी आपले कामगार / कर्मचारी म्हणवत नाही 

कागदोपत्री प्रत्येक व्यक्तीशी स्वतंत्र करार केला जातो ; ज्याची किचकट , कायदेशीर इंग्रजी भाषा ते वाचत देखील नसतील , वाचले तर त्यांना काही कळत देखील नसेल 

भारतात फक्त फूड डिलिव्हरी बॉईजची संख्या एका अंदाजानुसार ४० लाख आहे; बाकी इ कॉमर्स , औषधे घरपोच पोचवणाऱ्याची संख्या असेल तेवढीच 

एकामागून एक ईकॉमर्स कंपन्यांचे पब्लिक इश्यू येत आहेत ; त्या कंपन्यातील मूठभर कॉर्पोरेट एक्सिकयुटीव्ह बोनस . स्टॉक ऑप्शन्स वगैरेतून कोट्यवधी रुपये मिळत आहेत 

कोणाच्या जीवावर ?

या टॉप एक्सिकटीव्ह ने कमावलेल्या वार्षिक उत्पन्नावर आणि त्यांच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांनी मिळवलेल्या भांडवली नफ्यावर 

त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या हजारो डिलिव्हरी बॉईजचे रक्त आणि घाम लागला आहे ; 

पण पैशाची , उपभोगाची , करियरची नशा एवढी आहे कि तो वास त्यांना येतच नाही.

आणि आपले शासन कोठे आहे ?

श्रम विकणारा आणि श्रम विकत घेणारा यांच्यातील हा खाजगी व्यवहार म्हणायचे  ? समाजाला काही देणेघेणे नाही ? संसदेला काही देणे घेणे नाही ? लॉ ऑफ द लँड वाल्यांचे काही म्हणणे नाही ? 

बहुसंख्य वाद वाले जरा लक्ष तर द्या ; डिलिव्हरी बॉईज मधील बहुसंख्य तर देशातील बहुसंख्यांकांची मुले आहेत !

लेखक : संजीव चांदोरकर

Post a Comment

0 Comments

|