Header Ads Widget


जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

नंदुरबार,दि.26 जानेवारी,2023 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी धनजंय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुंबे, तहसिलदार उल्हास देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार तसेच  कृषि विज्ञान केंद्र,कोळदा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या सकस आहार पाककृती स्पर्धेमध्ये  प्रथम विजेत्या अक्काराणी लोक 
संचलित साधन केंद्र, तोरणा लोक संचलित साधन केंद्र, जागृती लोक संचलित केंद्र,धडगाव, रानिकाजल लोक संचलित साधन केंद्र, चेतना लोक संचलित साधन केंद्र,
कल्याणी लोक संचलित साधन केंद्र,अक्कलकुवा, प्रेरणा लोक संचलित साधन केंद्र, नंदुरबार  सावित्रीबाई फुले लोक संचलित केंद्र, शहादा  
तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी  जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

0 Comments

|