Header Ads Widget


नवापूर वनविभागाची धडक कारवाई ! गवतात लपविलेले 50 हजार रुपये किमतीचे शिसम व सागाचे लाकूड जप्त..



नवापूर! Navapur/LivenationNews 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिक्षेत्र अंतर्गत असलेल्या सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नवापूर वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक वनक्षेत्र स्टॉफ नवापुर प्रादेशिकसह शासकीय सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक वन्यजीव धनंजय पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांच्या समवेत नवापूर वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल व त्यांच्या वनपरिक्षेत्र नवापूर प्रादेशिक यांनी शासकीय वाहनाने नवापूर तालुक्यातील भवरे गावात तिखली फळीतील भरत रत्या गावित याच्या राहत्या घराजवळ जाऊन पाहणी केली असता, रस्त्याच्या कडेलगत असलेल्या गवताखाली शिसम व सागच्या प्रजातीची लाकडे गवतात लपवलेली आढळून आली, त्यावरून सदरची लाकडे जप्त करून ती शासकीय वाहनाने नवापूर विक्री आगार येथे आणून जमा केले असून, सदर जप्त करण्यात आलेल्या सिसम चार  नग व साग दोन नग असा एकूण 0.290 घनमीटर या मालाची बाजारभावानुसार अंदाजे 40 ते 50 हजार रुपये एवढी किंमत असून, सदरचा मुद्देमाल हा नवापूर विक्री आगार येथे जमा करण्यात आला असून, सदरची कारवाई सहाय्यक वन संरक्षण प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार धनंजय पवार, नवापूर वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, खेकडा वनपाल भिवाजी दराडे, वनरक्षक कल्पेश अहिरे, संतोष गायकवाड, उदयसिंग पाडवी, वाहन चालक दिलीप गुरव यांनी वनसंरक्षक धुळे विवेक होशिंग, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग कृष्णा भंवर, विभागीय वनअधिकारी दक्षतापथक धुळे संजय पाटील, सहाय्यक वनसंरक्षण प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, नवापूर वनक्षेत्रपाल नंदुरबार वनविभाग यांच्याकडून जनतेस आवाहन करण्यात आले आहे की वन्य व वन्यजीव तसेच वाहतूक लाकूड संबंधात कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 19 26 वर संपर्क करावा.

Post a Comment

0 Comments

|