शहादा ! Shahada/LivenationNews
शहादा येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार, यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आला दिवसेंदिवस रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून वाहनचालकांनी परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होईल असा आशावाद नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक, रोहन जाधव व रोहन गिरासे यांनी व्यक्त केला. नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार परिवहन विभागात शहादा येथे मासिक कॅम्प मध्ये रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्ताने शासकीय विश्रामगृह जवळ, नवीन वाहन परवाना काढण्यासाठी आलेल्या सर्व लोकांना वाहतुकीचे सर्वसाधारण नियम याचे महत्त्व पटवून दिले तसेच नियमित वाहन चालवताना हेल्मेट परिधान करणे, वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये, वाहतूक चिन्हांचे व सिग्नल चे उल्लंघन करू नये, वाहन धोकादाय स्थितीत उभे करू नये, दुचाकी वाहनावर चालकाने स्वतः खेरीज एकाहून अधिक व्यक्ती घेऊन प्रवास करू नये, मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या अपात्र असताना वाहन चालवू नये, दारू किंवा अमली पदार्थाच्या नशेत वाहन चालू नये, विधी ग्राहक कागदपत्रांशिवाय वाहन चालविणे गुन्हा आहे, दारू पिऊन वाहन चालू नका, वाहतूक नियम चिन्हांच्या पालन करा, दोन वाहनात सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करा, या कार्यक्रमावेळी शहादा शहरातील सर्व ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक उपस्थित होते.
0 Comments