Header Ads Widget


बाळासाहेबांची शिवसेनेचं (शिंदे गट) यश नंदुरबार तालुक्यातील 18 पैकी 13 जागांवर उपसरपंच पदी विजय..



नंदुरबार!Nandurbar LivenationNews
प्रतिनिधी/सईद कुरेशी 


नंदुरबार तालुक्यातील नुकत्याच झालेल्या 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर उपसरपंचपदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना प्रणित पॅनलने 13 जागांवर लोकनियुक्त सरपंचसह विजय मिळविलेला आहे. निवडणूकीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. नंदुरबार तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविण्यात आल्यात त्यात 10 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळविण्यात मोठं यश संपादन केले. सोमवार व मंगळवारी उपसरपंच पदासाठीच्या त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये निवडनुक प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडनुक प्रक्रियेत  बाळासाहेबांची शिवसेना प्रणित पॅनलने 13 जागांवर विजयाचा ठसा उमटवला. तालुक्यातील निवडून आलेले उपसरपंच नितीन नागरे (ढंडाणे), तानाजी वसावे (धानोरा), भजन भील(ओसरली), अशोक पाटील (घोटाणे), चमेलाबाई पाटील (तलावडे खुर्द), चंद्रकांत गवळे (खैराळे), रतन भील (तिसी), विनोद नाईक (कोठडे), प्रभाकर पाटील (कानर्दे), श्रीराम नाईक (करणखेडा), प्रतिभा राजपूत (राकसवाडे), सुनीता तमायचेकर (घुली). नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना प्रेनीत ( शिंदे गट) पॅनलने मोठे यश मिळविले आहे. ग्रामीण भागातील जनतेने बाळासाहेबांची शिवसेनेवर( शिंदे गटावर) विश्वास दर्शवलेला आहे.
असे प्रतिपादन, बाळासाहेबांची शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments

|