Header Ads Widget


चौगाव गावातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, समाजकार्य महाविद्यालय अंतर्गत गुड टच , बॅड टच याविषयी व्याख्यानमाला संपन्न...

 


चौगाव/ प्रतिनिधी: समता शिक्षण संस्था पुणे, संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे ता. जि. धुळे तसेच कै. श्री.वेडू नारायण पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चौगाव ता.जि.धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी गुड टच आणि बॅड टच या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन समाजकार्य महाविद्यालयातील बी.एस.डब्ल्यू. तृतीय व एम.एस.डब्ल्यू. द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थींनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. फरीदा खान यांनी गुड टच आणि बॅड टच या विषयावर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.वाढत्या बलात्काराचे प्रमाण यावर शालेय मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले. व यावर शाळेतील वेगवेगळ्या समित्या तसेच शासनाचे महत्त्वाचे कायदे, नियम, हेल्पलाइन नंबर, यावर विशेष चर्चा करून मुलींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे? व स्वतःवर किंवा दुसऱ्या मुलींवर होणारा अत्याचारास आळा कसा घालता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे चे प्राचार्य, प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित म्हणून लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अरुण देवचंद खैरनार, ( कै. श्री. वेडू नारायण पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ), प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ. फरिदा खान ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, ता. जि. धुळे ), कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक जी.जी.पाटील,श्री.एस.पी.सोनार, सौ. एस.एस. बागले, क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा.डॉ. दिलीप घोंगडे, कार्यक्रमाचे नियोजन गौरव नाईक , जयश्री पाटील, अर्चना सूर्यवंशी, आकाश गांगुर्डे , दिपाली पालवी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पवार यांनी केले. व आभार प्रदर्शन वर्षा गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमात कै.श्री. वेडू नारायण पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चौगाव येथील विद्यार्थी व विध्यार्थीनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|