Header Ads Widget


शहादा महाविद्यालयात विश्वगुरू भारत विषयावर हिंदी विभागाच्या विविध स्पर्धा संपन्न...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे 

शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागा तर्फे" विश्वगुरू भारत" या संकल्पनेवर आधारित हिंदी निबंध लेखन, हिंदी काव्य लेखन व पोस्टर स्पर्धा संपन्न झाल्या.

या स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्रा.डॉ.डी. डी. पटेल, प्रा.दिलीप सूर्यवंशी यांनी कार्य केले. हिंदी निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक गवारा जिऱ्या मोचडा (एसवायबीए), द्वितीय क्रमांक भुवन दारासिंग वळवी (एसवायबीए), तृतीय क्रमांक पावरा दिलीप जयसिंग (एसवायबीए) तसेच हिंदी काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक गायत्री रवींद्र जाधव( एफवायबीए ),द्वितीय क्रमांक सोनवणे खुशबू घनश्याम (एफवायबीकॉम), तृतीय क्रमांक जयस्वार अंजली सुभाष (एसवायबीएस्सी),पोस्टर्स स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्षल किशोर पवार (एसवायबीए ),द्वितीय क्रमांक पावरा जितराम कुवरसिंग (एसवायबीए), तृतीय क्रमांक श्रीकांत दिनेश बोरसे (अकरावी विज्ञान) यांना प्राप्त झाला. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निबंधांच्या व कवितांच्या पांडुलिपी संग्रहाचे अनावरणही प्राचार्यांचे हस्ते करण्यात आले.हिंदी विभागातर्फे दरवर्षी संपन्न होणा-या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील,प्राचार्य डॉ.एम .के .पटेल यांनी केले. कार्यक्रमासाठी हिंदी विभाग प्रमुख डॉ.गौतम कुवर व प्रा.डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|