शहादा/प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संचालित कौशल्य विकास केंद्रांचे आँनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते तसेच कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रसाद लोढा व महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राच्या उपायुक्त श्रीमती निधी चौधरी यांचा उपस्थितीत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाले.
महाराष्ट्रातील युवकांना स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागातील महाविद्यालयांना कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याविषयी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार राज्यातील 108 महाविद्यालयांनी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास केंद्राचे विविध अभ्यासक्रम आपल्या महाविद्यालयांमध्ये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली. या महाविद्यालयांच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते आँनलाईन करण्यात आले.कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या आँनलाईन उद्घाटन सोहळ्यासाठी पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकास विभागा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीण्यता यांच्या आधारे व्यक्ती स्वयंपूर्ण बनू शकते.तसेच युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य आत्मसात करणे महत्वाचे आहे याची माहिती त्यांनी दिली.प्रा.मयूर चौधरी यांनी महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्राबद्दल माहिती देत विद्याथ्यांना या सर्व कौशल्यांची कशी आवश्यकता आहे ते सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन कौशल्य विकास विभागाचे प्रा.भगवान पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments