Header Ads Widget


साक्री नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड...

साक्री प्रतिनिधी/अकिल शहा

साक्री नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवड प्रक्रिया पार पडली. यात नियोजन आणि विकास समिती सभापती पदी उपनगराध्यक्ष बापू गिते, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी उज्वला भोसले, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती पदी दिपक वाघ, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पदी प्रवीण निकुंभे, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी संगीता भावसार व उपसभापती पदी उषा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

साक्री येथील नगरपंचायतीत मागील दोन वर्षापासून भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर विषय समिती सभापतींना सुरुवातीला दोन वर्षाचा कार्यकाळ देण्यात आला होता या सभापतींनी मुदतीत त्यांच्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर नूतन सभापती निवडप्रक्रिया पार पाडली, यात विरोधी गटाकडून कुठलेही अर्ज दाखल न झाल्याने निवडप्रक्रिया बिनविरोध झाली.नगराध्यक्षा जयश्री पवार, उपनगराध्यक्ष बापू गिते, नगरसेविका रेखा सोनवणे, जयश्री पगारिया, मनीषा देसले, नर्गिस पठाण, सोनल नागरे, कल्पना खैरनार, नगरसेवक गजेंद्र भोसले, सुमीत नागरे, राहुल भोसले आदी उपस्थित होते. निवड प्रक्रिये प्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संजय बागडे उपस्थित होते, तर मुख्याधिकारी दीपक पाटील, कार्यालय अधिक्षक राजेश पाडवी, जुबेर शहा, अमोल पाठक, दीपक पाटील, विक्रम राठोड आदींनी त्यांना सहकार्य केले.

विषय समिती निवड प्रक्रियेसंगी भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, उपाध्यक्ष विजय भोसले, गजेंद्र भोसले, चंद्रजित पाटील, आदिवासी आघाडी प्रदेश चिटणीस हेमंत पवार, तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, महेंद्र देसले, विनोद पगारिया, स्वप्नील भावसार, आबा सोनवणे आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापतीचे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, खा. डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, धुळे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, जिल्हा परिषद कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्यासह नेत्यांकडून अभिनंदन करीत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

|