Header Ads Widget


आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे शहादा शहरात रुट मार्च...!! पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचेसह एकूण जवळपास ३०० पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सहभाग.

शहादा प्रतिनिधी : अल्ताफ शेख - आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच समाजकंटकांवर गुन्हेगारांवर वचक राहून निवडणूका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरीता दिनांक १५/०३/२०२४ रोजी सायंकाळी ०६:०० वाजे पासून ०७:०० वा. दरम्यान जिल्हा पोलीस दलातर्फे शहादा शहरात रुट मार्च घेण्यात आला.

सदर रुट मार्चच्यावेळी नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार, अक्कलकुव्वा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे, शहादा शहराचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत व सिमा सुरक्षा दल एकूण १८० (B.S.F.) यांचेसह एकूण १४ पोलीस अधिकारी  १८० अंमलदार उपस्थित होते.

सदर रुट मार्च शहादा शहर पोलीस ठाणे येथून निघून शहादा शहराचे गांधी पुतळा, खेतिया रोड, गरीब नवाज कॉलनी व ईतर संवेदनशील ठिकाण व मुख्य चौक या २.५ ते ३ कि.मी. च्या मार्गाने मार्गक्रमण करुन पुन्हा शहादा शहर पोलीस ठाणे येथे सदर रुट मार्च समाप्त झाला. 

आगामी लोकसभा निवडणूक-2024 साठी नंदुरबार जिल्हा प्रशासन पोलीस दल सज्ज आहे
जिल्हा पोलीस अधीक्षक 
श्री. श्रवण दत्त. एस

Post a Comment

0 Comments

|