Header Ads Widget


राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसनिमित्त, आज नंदुरबार येथे कुस्त्यांची दंगल रंगणार...


नंदूरबार/प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
यांच्या वाढदिवस निमित्त नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरातील शहर पोलीस ठाण्यासमोरील मैदानावर दुपारी दोन वाजता भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.हिना गावित, अमळनेर विधान सभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, डॉ. विक्रांत मोरे, नंदुरबार नगरपालिकेचे माजी नगरसेवक गटनेते चारुदत्त काळवनकर, आनंद अण्णा माळी, संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, नंदूरबार भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, निलेश पाडवी, गौरव चैधारी, नरेंद्र  माळी, सर्व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, नंदनगरीतील समस्त कुस्ती प्रेमी जनतेने या आयोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केतन रघुवंशी यानी केल आहे.

Post a Comment

0 Comments

|