Header Ads Widget


जागतिक आदिवासी दिनानिमित्त साजरा होणाऱ्या मिरवणुका तसेच अन्य कार्यक्रमांच्या सुरक्षिततेसाठी नंदुरबार शहर व जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात...


नंदुरबार/प्रतिनिधी


आज साजरा झालेल्या विश्व आदिवासी दिवसानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यात विशेष पोलीस पथके स्थापन करून, आदिवासी दिनानिमित्त साजरा होणाऱ्या मिरवणुका तसेच अन्य कार्यक्रमांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली आहे. 

आज साजरा होणाऱ्या विश्व आदिवासी दिवसानिमित्त राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, तसेच गृहरक्षक दलाचे कर्मचारीही तैनात करण्यात आले आले आहे, यात पुरुष गृहरक्षक दलाचे 350 व महिला गृह रक्षक 150 असे गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले असून, नंदुरबार जिल्ह्यात व शहर परिसरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत असून, त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या, सर्व गाव परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Thursday, June 12. | 10:25:32 AM