Header Ads Widget


रा.प.शहादा आगारातील लेखाकार श्री. देविदास उर्फ देवा पवार यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने गोवा राज्यत सन्मानित...

      

       जागतिक आदिवासी दिनानिमित्त  रविंद्र भवन मडगांव गोवा राज्य येथे 9 व 10 ऑगस्ट 2023 असे दोन दिवशीय आदिवासी अधिकारी व कर्मचारी यांचे अधिवेशन भरविण्यात आले होते. सदरच्या अधिवेशनाचे उद्घाटक गोवा राज्याचे राज्यपाल मा. महामहिम 
श्री पी एस श्रीधरन पिलाई, विशेष उपस्थित गोवा विधानसभेचे अध्यक्ष मा श्री रमेशजी तवडकर, मा श्री गोविंद गावडे सांस्कृतिक कला व क्रिडा मंत्री गोवा राज्य, महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. धर्मरावबाबा आत्राम, आमदार आमश्यादादा पाडवी हे उपस्थित होते. अनु. जाती व जमाती कमिशनचे अध्यक्ष मा. दिपक करमाळकर, फेडरेशन केंद्रीय अध्यक्ष मा. प्रा मधुकरराव उईके, केंद्रीय महासचिव मा. विजयराव कोकोडे, केंद्रीय संघटक मा डॉ चेतन कुमर मसराम, केंद्रीय सहकार्याध्यक्ष तथा अधिवेशन व्यवस्थापक मा. देविदास उर्फ देवा पवार, अधिवेशन नियोजन प्रमुख मा. डॉ. मधु धोडकिरेकर, गोवा राज्य अध्यक्ष ॲड. उपासो गावकर, तसेच केंद्रीय पदाधिकारी व महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, केरळ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक इत्यादी देश भरातून जवळपास एक हजार प्रतिनिधी या अधिवेशनासाठी हजर होते. आदिवासी समाजाच्या विविध समस्या त्याबाबत उहापोह झाला. त्याबाबत कमिटीने ठराव मांडून देशातील आदिवासींचे ग्राहणे देशपातळीवर अधिक तीव्रतेने नेण्याचे ठरविले.
गोवा राज्यात अनुसुचित क्षेत्र जाहीर करणे, देशभरात बोगस आदिवासी हे समाजाचे शोषक असून त्या बाबत सरकारने कठोर अंमल बजावणी करण्याचे ठरले , मणिपूर घटनेचा तीव्र निषेध नोंदवत अशा घटना घडू नयेत यासाठी  आदिवासी समाजाने शांत बसणे चालणार नाही. आदिवासी राज्यात सर्व संघटनांना सोबत घेऊन बुद्धिजीवी घेऊन कायदेशीर लढाई लढणे, या अधिवेशन निमित्ताने देशभरातील आदिवासी एक होत असून सरकारने त्याची वेळीच दखल घ्यावी असे मा अध्यक्ष श्री मधुकरराव उईके म्हणाले.

या अधिवेशनात विविध राज्यातून आलेल्या व समाजासाठी व फेडरेशनच्या उत्थानासाठी मेहनत घेणा-या निष्ठावंत 25 पदाधिकाऱ्यांना *राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.या गौरवार्थी मध्ये 14/15 राज्यात आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्र करून शाखा वाढवून समाज कार्यीत अग्रेसर असलेले धुळे जिल्ह्यातील सुपुत्र सन्माननीय देविदास उर्फ देवा पवार यांना गोवा राज्याचे सांस्कृतिक कला व क्रिडा मंत्री मा. गोविंद गावडे साहेब. यांच्या हस्ते मानाची घोंगडी व सन्मानपत्र देऊन राष्ट्रीय समाजरत्न  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गोवा येथे अधिवेशन साठी खान्देशातील 60/70 आदिवासी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|