नवापूर/प्रतिनिधी
आज मा.तहसीलदार नवापूर यांना सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने तातडीचे 4 मुद्यावर निवेदन देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी वन हक कायद्याची अंमलबजावणी ही संत गतीने सुरू असून या कायद्या नुसार वेयकतीक वन हक दावेदार व सामूहिक वन हक असे दोन्ही प्रकारचे हक दिले आहेत. परंतु नवापूर तालुक्यात आदिवासी कसत असलेली वन जमीन ज्या जमिनीचा दावा दाखल आहे त्यावर अमलबजावणी सुरू असताना तीच जमीन सामूहिक वन हक साठी मजूर केली आहे त्यामुळे भविष्यात हजारो आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचा डाव वन खाते व जिल्हा अधिकारी करीत आहे ज्या आदिवासींना वन पटा मजूर आहे त्याचा सुधा विचार केला गेला नाही त्यामुळे दिनांक 6/१२/२०२३ रोजी झालेले बेठकित मा.जिल्हा अधिकारी यांनी सामूहिक वन हक देण्यात आलेला आहे त्यात वेयकतीक वन हक दावेदार असेल त्याला बाहेर काढा असा आदेश देण्यात आलेला आहे.त्याचा आधार घेत वन खाते बेकायदेशीर पण आदिवासीच्या जमिनीत जाऊन मोजणी करतात ते त्वरित बंद करा ,तसेच बेडकिपाडा येथील आदिवासीच्या जमिनीत कोणतीही नोटीस न देता लघुपाटबंधारे खात व वन खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत लघु पाट बंधारा बांधण्यात सूर्वात केली आहे. ते ताबडतोब बंद करा , पी एम किसान योजनेचा लाभ वनपटाधारक शेतकऱ्याचा बंद केला आहे तो त्वरित सुरू करा,12 अ भरण्यासाठी वन दावे तलाठ्याकडे 2ते 3 वर्षा पासून पडून आहेत त्यावर लगेच निर्णय घेऊन पंचनामा करा या मागण्यासाठी निवेदन देण्यात आले .जर वरील मुद्यावर निर्णय न झालयास सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभे मार्फत तीर्व आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कॉम आर.टी.गावित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांनी दिला.
0 Comments