Header Ads Widget


राजू जव्हेरी यांनी त्यांचा आई वडिलांचा स्मृती प्रित्यर्थ भागवत कथेचे आयोजन...

प्रतिनिधी/ शहादा


         ईश्वर सर्वीकडे आहे म्हणूनच परमेश्वराचे नामस्मरण करण गरजेचं आहे . खराब सवय सुधारणा करण म्हणजेच भजन करणे होय अस प्रतिपादन ह भ प खगेंद्र महाराज यांनी भागवत कथा प्रसंगी केलं
        डोंगरगाव रोडवरील साईबाबा मंदिर परिसरात राजू जव्हेरी यांनी त्यांचा आई वडिलांचा स्मृती प्रित्यर्थ भागवत कथा आयोजित केली आहे . भागवत कथा दिनांक 25 मे पासून सुरू झाली असून भागवत कथेचा विषय शिवतत्त्व महिमा आहे .  पुढे बोलताना महाराज म्हणाले भंगाराचे काम करता करता शृंगाराच काम करणं म्हणजेच परमेश्वरास समर्पित होणं होय . शृंगार करताना देखील आपले संस्कार खराब होता कामा नये. संस्कार व संस्कृती ही भारताची ओळख संपूर्ण जगात आहे व ती जपन हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे . स्त्री जे काम माहेरी करू शकते ते काम ती सासरी करू शकत नाही हे उदाहरणा ने सांगितले. स्त्री ची माहेरी एकच अपेक्षा असते व ती म्हणजे आशा होय. ती सासरी जाताना भावाने एक रात्र राहून जा असे सांगावे ही एक आशा असते . हे ऐकत असताना संपूर्ण सभा मंडपात भावुक वातावरण झाले होते . 
         धर्म शक्ती वाढवा यासाठी आजचा मुला मुलींना हनुमान चालीसा वाचायला शिकवा. धर्म टिकविण्यासाठी अश्या भागवत कथेचे आयोजन होणं गरजेचं आहे . अधून मधून भक्ती गीत सादर केले जात होते त्यामुळे महिला व पुरुष वर्ग भक्ती गीतावर ठेका घेत होते त्यामुळे संपूर्ण सभामंडपात भक्तीमय वातावरण तयार झाले होते . रोज वेगवेगळ्या जिवंत झाकीने देखील सभामंडपाचे लक्ष वेधून घेतले होते . कृष्ण जन्म दिनांक 29 मे रोजी असून कथेची वेळ दुपारी 3 ते 6 असून . कथेची सांगता 1 जून रोजी असून महाप्रसादाचे आयोजन  सकाळी 11 वाजता करण्यात येणार असल्याचे आयोजक राजू जोहरी,  भटू जोहरी, भरत जोहरी, लक्ष्मण जोहरी यांच्या मार्फत करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments

|