नवापूर/प्रतिनिधी
नवापूर दि.25 मार्च 2023 रोजी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश सामाजिक संघटनेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन नवापूर येथे करण्यात आले. सर्व प्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संघटनेच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. मनिषा सुनिल गावित यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर संघटनेचे ग्रामीण तालुकाध्यक्ष श्री वसंत वाणी यांच्या हस्ते कुलदैवी याहामोगी देवमोगरा मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाने खान्देश अध्यक्ष पंकज आहिरे यांनी अध्यक्षतेखाली चर्चासत्र व संघटनेचे महत्त्व विषद करीत संघटनेने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच दिवशी तालुकास्तरावर उपोषण, एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगरपरिषदेने करोडोंचा घोटाळ्या संदर्भात सी. बी. आय ला निवेदन देत नवी दिल्ली येथे जंतरमंतर येथे केलेले आंदोलन,धरणे,तसेच माहिती अधिकारात राज्यातील 387 नगरपरिषदा व नगरपंचायत यांचाकडे माहिती मागणी केली आहे त्यात 100 नगरपरिषद/ नगरपंचायत यांनी माहिती दिली आहे. उर्वरित माहिती लवकरच हाती येणार आहे.खानदेशातील नंदुरबार,धूळे,जळगांव जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांची इत्यंभूत माहिती आली आहे.त्यात रोजंदारी सफाई कामगार,रोजंदारी कर्मचारी यांना भविष्य निर्वाह निधी चा लाभ न देता तुटपुंजी पगार देत अधिकारी व रोजंदारी मजूर पुरवठा ठेकेदार मनमानी करीत आहेत. रोजंदारी सफाई कर्मचारी, मजूर यांच्या तोंडाचा घास हिरावून खाणाऱ्या अधिकारी व पुरवठा ठेकेदार मजुरांचा तळतळाट घेत आहेत.संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत यांनी सफाई कामगारांना कमी रोजगार देऊन एकप्रकारे थट्टाच केली आहे. नगरपरिषद अधिनियमात जास्त रोजंदारी असूनही मजूरांना त्यांचा हक्क मिळायलाच हवा.भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेने भ्रष्टाचाराला मिटवण्यासाठी सोशल मीडिया,प्रिंटमिडियावर जनजागृती करीत आहे तसेच संपूर्ण राज्यातील पदाधिकारी, सदस्य,अहोरात्र कार्य करीत आहेत. असे संघटनेचे कार्य व महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संघटनेचे बिलाल भाणा यांनी संघटनेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री सूनिल गावीत यांनी केले.यावेळी नंदुरबार जिल्हा महासचिव अजय आतारकर, नवापूर महिला तालुकाध्यक्ष सौ. मनिषा सूनिल गावीत, हर्षाली ताई गावीत,नवापूर महीला तालुका उपाध्यक्ष सौ. मिखा प्रशांत गावीत,नवापूर तालुकाध्यक्ष निषाद गावीत, ग्रामीण तालुकाध्यक्ष वसंत वाणी, तालुका संघटक उमेश वसावे,नवापूर तालुका महासचिव यशपाल वसावे, तालुका कार्याध्यक्ष कमलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष विनोद झांझरे, नवापूर शहराध्यक्ष रय्याम सय्यद,नवापूर ग्रामीण तालुका उपाध्यक्ष बिलाल अबू हमीद भाणा, आदि पदाधिकारी वर्धापनदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
0 Comments