Header Ads Widget


कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कार्यवाही,11 लक्ष 57हजार रुपये किमतीचे बियाणसह वाहन जप्त; बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले..

 

सारंगखेडा/प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत दि.26 मे 2023 रोजी दुपारी 5 वाजता जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, विनापरवाना कापूस बियाणे खाजगी वाहनाने येत असल्याचे समजले, त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नरेंद्र  पाडवी यांनी विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील व शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे व कृषी अधिकारी योगेश हिवराळे, अभय कौर यांनी सापडा रचून वाहन क्र. GJ 06 PC 3532 अडविली व विचारपूस केली असता, वाहनचालक चंद्रकांत पांढुरंग माळी रा. कळंबु ता. शहादा जिल्हा नंदुरबार हा स्वतः वाहन चालवत असून, विनापरवाना बियाणे जिल्हा बडोदा गुजरात राज्य येथून आणत असल्याचे कबुल केले. विभागीय कृषी सहसंचालक, नासिक विभाग, नासिक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार तानाजी खर्डे  व प्रकाश खरमाळे कृषी विकास अधिकारी जि. प. नंदुरबार, तसेच संजय शेवाळे तंत्र अधिकारी गुण नियंत्रण यांच्या मार्गदर्शन व परवानगीने पुढील कायदेशीर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.                                                                     सदरील वाहनात एकूण 17 पोते ( 657 पाकिटे) अंदाजीय रक्कम 11 लक्ष 57 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीवर बियाणे कायदा 1966, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा 2009, बियाणे नियंत्रण आदेश 1983 अन्वये शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सारंगखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Wednesday, April 30. | 9:08:37 AM