प्रतिनिधि /तळोदा
आज 30 एप्रिल 2023 वार रविवार रोजी तळोदा ब्लड स्टोरेज सेंटर उद्घाटन सोहळा झाला. श्री नवजीवन ब्लड बँक सेंटर धुळे व जनकल्याण ब्लड बँक,नंदुरबार यांच्या माध्यमाने तळोदा शहरात तळोदा ब्लड स्टोरेज सेंटर उघडण्यात आले. या कार्यक्रमात ब्लड बँकेने सातत्याने रक्तदान शिबिर घेणाऱ्यांच्या व्यक्तींच्या,संस्थेच्या सत्कार सन्मान गौरव कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक शहादा-तळोदा मतदारसंघाचे लोकनियुक्त आमदार श्री.राजेश दादा पाडवी,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.शशिकांत जी वाणी,कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ.वसंत भाई अशोक पाटील एम.टी.सी.एल लिमिटेड स्वतंत्र संचालक भारत सरकार सुदर्शन नेत्रालय चे डॉक्टर शहादा, मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.अजय भैय्या परदेशी,डॉ.स्वप्नील बैसाणे, भाजपा शहर अध्यक्ष श्री.योगेशभाऊ चौधरी,श्री नवजीवन ब्लड बँकेचे श्री.सुनील भाऊ चौधरी,जनकल्याण ब्लड बँकेचे श्री.सुधीर भाई देसाई मान्यवर मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा संस्थेच्या सन्मानित गौरव करण्यात आला.यावेळी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी हा सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने स्वीकारला.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह ॲड.संजय जी पुरणीक, विमलगिरी हॉस्पिटलचे डॉ.सारंग माळी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री.विजयरावजी सोनवणे, सेवाप्रमुख डॉ.शांतीलाल जी पिंपरी,ॲड.संदीप माळी, प्रखंड अध्यक्ष राजाराम राणे सर,प्रखंड मंत्री श्री.ऋषिकेश जी बारगड, प्रखंड उपाध्यक्ष,श्री.राजन पाडवी,डॉ.योगेश जी बडगुजर हे उपस्थित होते.
0 Comments