वर्धा : जिल्ह्यातील सिंदी रेल्वे नजीक गौळभोसा येथे शेतातील विहिरीचे काम सुरू असताना अचानक विहीर खचली. यात ढिगाऱ्याखाली दोन मजुरांचा मृत्य झालं आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाचे एस डी आर एफ चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून गेल्या १८ तासापासून शोध घेत असून अद्यापही मृतदेह मिळून आले नाहीत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे नजीक गौळभोसा या ठिकाणी एक शेतात विहिरीच्या खोदकामाचे काम सुरू होते. काम सुरू असताना अचानक वर काढलेला गाळ विहरित पडून आला. यात मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबून दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत मजुरांमध्ये ४० वर्षीय अमोल दशरथ टेंभरे व २८ वर्षाच्या पंकज प्रभाकर खडतकर याचा समावेश आहे.
काल सायंकाळपर्यंत दबलेल्या मजुरांना काढणे शक्य झाले नसल्याने महसूल विभागाने एस. डी. आर. एफ. च्या पथकाला पाचारण केले होते. आज सकाळपासून मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू आहे. तब्बल ५० फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये २० फूट माती ढासळली आहे. आतापर्यंत घटनेला १८ तास उलटले असून शेतातील विहिरीमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
0 Comments