प्रतिनिधी/अकिल शहा
साक्री : मार्च २०२३ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस. एस. सी.) परीक्षा २ मार्चपासून तर २५ मार्चपर्यंत पार पडल्या. साक्री केंद्रावर संलग्नित १७ शाळांचे एकूण ९५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र संचालक तथा तामसवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. साळुंखे यांनी साक्री केंद्रावरील परीक्षेचे संचालन केले. येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या परीक्षेत गैर मार्ग घडला नाही. तसेच इमारती बाहेरूनही पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार उद्भवला नाही.
४० वर्ग खोल्यांमध्ये प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा कमी एकूण ८६ पर्यवेक्षकांची नियुक्ती झाली होती. उपकेंद्र संचालक, अतिरिक्त पर्यवेक्षक, स्टेशनरी सुपरवायझर, लिपिक, शिपाई आदींच्याही परीक्षा कामी नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. दहावी व बारावीचे एकाच दिवशी पेपर असल्याने दोन दिवस बैठक व्यवस्थेसाठी केंद्रावर साक्रीतील आदर्श माध्यमिक विद्यालय व गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल येथून अतिरिक्त बेंच उपलब्ध करण्यात आले होते.
परीक्षेत बसला 'कॉपी'ला आळा यंदा बोर्डाच्या परीक्षेत नांदेड पॅटर्न राबविण्यात आल्याने साक्री केंद्रावर कॉपीला चांगलाच चाप लागला होता. माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले, प्रकल्प अधिकारी तृप्ती घोडमिसे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे या अधिकाऱ्यांनी परीक्षा काळात केंद्राला भेटी दिल्या तसेच प्रत्येक दिवशी कॉपी बहाद्दरांना नियंत्रित करण्यासाठी बैठे पथक नेमण्यात आले होते. त्यामुळे साखरी केंद्रावर परीक्षेवेळी 'कॉपी'ला आळा बसला.
केंद्र संचालक एन. एस. साळुंखे यांना के. डी. सोनवणे, संदीप सोनवणे व श्रीमती तारकेश्वरी निकम या तीन उपकेंद्र संचालकांनी परीक्षा संचलन करण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्यासह एस. वाय. पाटील, जे. बी. मासुळे, वाय. यु. भामरे, एन. बी. सोनवणे यांनी बारकोड वाटप, उपस्थिती अनुपस्थिती अहवाल तयार करणे, विविध प्रपत्र भरून घेणे, प्रश्नपत्रिकांचा व उत्तरपत्रिकांचा हिशोब ठेवणे आदी कामांची जबाबदारी पार पाडली. आर. एल. बोरसे, डी. एन.पाटील, एल बी मोरे, पत्रकार जी. टी. मोहिते यांनी दक्षता समितीचे सदस्य म्हणून भूमिका पार पाडली. साक्री परिरक्षक कार्यालयाचे प्रमुख तथा ग.शि. राजेंद्र पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. डी. खैरनार यांनी सहाय्यक परिरक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षा केंद्राला न्यू इंग्लिश स्कूल साक्रीचे मुख्याध्यापक संजय पाटील यांनी सहकार्य केले.
केंद्र संचालक एन एस साळुंखेंचा झाला सत्कार
एप्रिल अखेर निवृत्त होणारे तसेच ३३ वर्षांच्या सेवेत २२ वेळा केंद्र संचालक म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडलेल्या तामसवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा साक्री केंद्राचे केंद्र संचालक एन एस साळुंखे यांचा सर्व पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी आर. ए. पगारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. परीक्षेचे अचूक नियोजन, केंद्रावर पूर्ण नियंत्रण तसेच परीक्षा कामाची जबाबदारी विभागून प्रत्येकाकडून उत्कृष्ट काम करून घेण्याची हातोटी म्हणून श्री साळुंखे यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन चंद्रजीत भामरे यांनी केले.
0 Comments