Header Ads Widget


धक्कादायक कृत्य ! केकचे पैसे मागितल्याने दुकानदारावर उगारला कोयता; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

 

नाशिक : पुणे शहरात धुमाकूळ घातलेली कोयता गँग आता नाशिकमध्ये पोहचली आहे. काल (रविवारी) रात्री नाशिक शहरात कोयता गँगचा थरार पहायला मिळाला. सातपूर पिरसरात एका केक दुकानदारावर कोयते घेऊन काही मुलं धावून आली होती. या घटनेबाबत दुकानदाराने पोलिस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. पोलीस नाशकातील या कोयता गँगचा शोध घेततायत. ( koyata gang)

समोर आलेल्या माहितीनुसार, सदर धक्कादायक घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. सातपूर परिसरात असेल्या केकच्या दुकानात काल रात्री २ व्यक्ती केक घेण्यासाठी आले होते. त्यवेळी त्यातील एक तरुण केक घेऊन पैसे न देताच दुकानातून बाहेर निघाला. दुकानदाराच्या हे लक्षात येताच त्याने दुसऱ्या व्यक्तीला तो तरुण तुमच्यासोबत आहे का असे विचारले. त्यावर त्या व्यक्तीने नाही असे उत्तर दिले.

Full Video On Twitter

Post a Comment

0 Comments

|