Header Ads Widget


शेवाळी गावात प्रथमच वि.वि.का.सोसायटीच्या माध्यमातून रासायनिक खत विक्रीचा शुभारंभ..


प्रतिनिधी/अकील शहा
साक्री :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा) आज दि.२९/०३/२०२३ वार बुधवार रोजी  प्रथमच शेवाळी वि.वि.का.सोसायटीच्या माध्यमातून रासायनिक खत विक्रीचा शुभारंभ करण्यात आला या वेळी साक्री पंचायत समितीचे क्रुषी अधिकारी श्री.रमेश महादेव नेतनराव यांच्या शुभहस्ते रासायनिक खत विक्रीचा शुभांरभ करण्यात आला. या वेळी साक्री पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.विजय काकुळते,तामतरे साहेब उपस्थितीत होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गावातील जेष्ठ नागरिक बाबुराव साळुंके यांना देण्यात आले शेवाळी वि.वि.कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री.दिपक साळुंके यांनी प्रस्तावना केली त्यानंतर विजय काकुळते,अरूण साळुंके,रमेश नेतनराव यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी पंचायत समीतीचे मा.उपसभापती नितीन दादा साळुंके तसेच विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन साहेबराव साळुंके,  संचालक माधवराव नांद्रे,अशोक साळुंके,अशोक भदाणे,ऊत्तम माळचे,सतिष साळुंके,सोमा कारंडे, सौ.शैलाबाई साळुंके,आशाबाई नांद्रे,स्विक्रुत सदस्य नंदकुमार साळुंके,राजेंद्र साळुंके सचिव वेंन्दे नाना तसेच ग्राम सुधार मंडळाचे चेअरमन साहेबराव साळुंके,शेवाळी गावाचे मा.सरपंच दगाजी साळुंके तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव व शेवाळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Today is Tuesday, April 22. | 6:04:46 AM