Header Ads Widget


सोमवार 6 मार्च 2023 ला होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

नंदुरबार/ बुलेटिन 

जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी  सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 6 मार्च,2023 रोजी  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी दिली आहे.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज सोमवार 6 मार्च,2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून सादर करावेत, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Friday, April 18. | 1:39:44 AM