अक्ककुवा :- प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ संचलीत जामिया अली अल्लाना औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय अक्कलकुवा येथे भारत सरकार मानव संसाधन विभाग इन्स्टीटयुशन काउन्सील यांच्या निर्देशानुसार संस्थेचे संस्थापक मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी, प्राचार्य डॉ. जावेद खान यांच्या मार्गदर्शनाखाली "फार्माकोव्हीजीलन्स" या विषयांवर तीन दिवसीय कार्यशाळा झाली कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जावेद खान यांनी केले.
कार्यशाळा आयोजन सहा सत्रात करण्यात आले. सर्व सत्रात " फार्माविज " संस्थेचे संस्थापक अब्दुल अझीम, हैद्राबाद यांनी तृतीय वर्ष आणि अंतिम वर्ष औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या एकुण १६० विद्यार्थ्यांना फार्माकोव्हीजीलन्स, औषधांचा अतिवापर त्यातुन निर्माण होणारा संभाव्य धोका, तसेच या क्षेत्रातील कामकाजांचा प्रत्यक्ष अनुभव यावा यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांची टेस्ट घेण्यात आली. त्यातुन काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच महाविद्यालय आणि फार्माविझ संस्था यांच्या दरम्यान योग्य व्यक्तीस योग्य नोकरी असा सामंजस्य करार करण्यात आला.
0 Comments