Header Ads Widget


गर्भलिंग चाचणी करणारा रॅकेट उघडकीस.

 

Kolhapur Bulletin

कोल्हापूर, दि. ०३/०२/२०२३.
राधानगरी पोलीस ठाणे व कोल्हापूर जिल्हामध्ये गर्भलिंग चाचणी करणारे रँकेट तयार झाले होते. त्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचीत केले होते. त्याप्रमाणे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष कोल्हापूर यांनी कारवाई करून ०३ इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून एक सोनोग्राफी मशिन हस्तगत केले होते. त्यानुसार राधानगरी पोलीस ठाणेत भा.द.वि.स.कलम ३१५, ४१९, ३४ सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायीक अधिनियम १९६१ चे कलम ३३ सह महाराष्ट्र शुश्रृषा गृह नोंदणी कायदा कलम ५, ६, सह वैद्यकिय गर्भपात अधिनियम १९७१ चे कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंद होता. सदर गुन्ह्यात राधानगरी पोलीसांनी अधिक तपास करून आणखी ०४ इसमांना अटक करून त्यांची १४ दिवस पोलीस कोठडी घेवून गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, आणखी ०२ इसमाचा नाव मुख्य सूत्रदार म्हणून अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो राधानगरी यांनी दि.०४/०२/२०२३ पोलीस कोठडी रिमांड मुंजर केली आहे. तपासा दरम्यान आरोपी याचेकडून आणखीन एक डिजीटल सोनोग्राफी मशिन जप्त केलली असून सदर गुन्ह्याचा सखोल तपास चालु आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, श्री शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री मंगेश चव्हाण, शहर विभाग अतिकार्यभार शाहुवाडी विभाग, कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली मा.पो.नि.स्वाती गायकवाड, मा.पो.नि.एस.एम.यादव, पोलीस उप निरीक्षक विजयसिंह घाडगे, पोहेकॉ ८५ के.डी.लोकरे, पोहेकॉ १०७३ बी.डी.पाटील, पोहेकॉ २०२७ सुरेश मेटील, पो.हेकाँ.११०९ सचीन पारखे, पोकॉ १४१५ गजानन गुरव,पो.काँ. १५९९ रोहीत खाडे, पोकॉ २३७७ रणजीत वरोटे, चालक पो.ना.२०९३ कृष्णात साळोखे, पो.ना.१९७३ दिगंबर पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|