नंदुरबार : (जिमाका वृत्तसेवा): भारतीय डाक विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस कार्यालयात 9 व 10 फेब्रुवारी,2023 या कालावधीत सुकन्या समृद्धी योजनेचे खाती उघडण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती धुळे विभाग, प्रवर अधिक्षक डाकघर, प्रताप सोनवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाती उघडण्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत मुलीचे व पालकांचे दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र कागदपत्रे आवश्यक आहे. या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.सोनवणे यांनी केले आहे.
0 Comments