Header Ads Widget


नंदुरबार येथे शॉर्टसर्किटमुळे टाटा एस वाहनाला भीषण आग..

नंदुरबार शहरात नवापूर चौफुली येथे टाटा कंपनीच्या एस - एचटी मॉडेलच्या चारचाकी गाडीला वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे भीषण आग लागली. घटनास्थळी संपूर्ण वाहन जळून खाक झाली. 


चालक आणि त्याचा सहाय्यक सुखरूप आहेत. काही दिवसांपूर्वी विसरवाडीजवळही अशीच घटना घडली होती, त्यात ट्रक जळून खाक झाली होती. 


आग लागल्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांची व  नागरिकांची गर्दी झाली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी नंदुरबार नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला व त्यांना घटनांची माहिती दिली. 


त्यानंतर तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यात आली. वाहनात रेशनचा तांदूळ होता. जे नंदुरबारहून खांडबाराकडे जात होता.

Post a Comment

0 Comments

|