Header Ads Widget


नंदुरबार जिल्हापरिषदेत वारंवार तक्रारी झालेल्या अधिकाऱ्यांचा पदभार काढण्याबाबत स्थायी समिती सदस्यांचे संतप्त अहवाल ....


नंदुरबार!Nandurbar LivenationNews

नंदुरबार जिल्हा परिषदेत वारंवार तक्रारी झालेल्या अधिकाऱ्यांचा पदाचा पदभार काढण्यात बाबत स्थायी समिती सदस्यांचा आक्रमक पवित्रा, तर शिक्षण विभागात सुरू असलेला सावळा गोंधळ थांबविण्याची स्थायी समिती सदस्य भरत गावित यांची मागणी. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांचे रजेचे अर्ज आले असल्यास त्यांच्या रजा मंजुर करण्याबाबत विचार करणे, सदस्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तरे देणे, शासनाकडून आलेले महत्त्वाचे शासन निर्णय परिपत्रके यांचे वाचन करणे, मागील सभेने केलेल्या ठरावावरील पूर्ततेचा आढावा घेणे,दिनांक 4 जानेवारी 2023 रोजीचे जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेचे इतिवृत्त वाचन  करणे, तसेच जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचा कामाचा आढावा सादर करणे, त्यात कृषी समिती पशुसंवर्धन समिती समाज कल्याण समिती महिला व बालकल्याण समिती अर्थ समिती बांधकाम समिती शिक्षण समिती प्राथमिक व माध्यमिक आरोग्य समिती जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभाग लघुसिंचन विभाग ग्रामपंचायत विभाग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग तसेच सभापती तथा अध्यक्ष यांच्या पूर्वपरवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे यावर स्थायी समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली, यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, आरोग्य व वित्त सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, तसेच स्थायी समितीचे सदस्य ऐश्वर्या रावल, जयश्री पाटील, भरत गावित, मोहन शेवाळे, व राया मावची उपस्थित होते, स्थायी समितीच्या सभेत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जुन्या जागांवर स्मशानभूमी म्हणून वर्षानुवर्षे वापर होत असलेल्या जागा ग्रामपंचायतीच्या नावे करून घेणे व त्या जागी स्मशानभूमीची निर्मिती करून घेणे बाबतचा प्रस्ताव स्थायी समिती सदस्य राहण्याची यांनी सभेत मांडला, त्याचप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन न झाल्याने अद्याप सन 2021-22 च्या लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता अद्याप मिळाला नसता बाबतची तक्रार राया मावशी यांनी सभेत मांडली तसेच सारंखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीची मागणी ऐश्वर्या रावल यांनी केली, तर शिक्षण विभागाचा नवापूर तालुका इक्रा एज्युकेशन सोसायटीच्या शिपाई अध्यक्षांचा वादाची अद्याप दखल घेतली नसल्याची तक्रार भरत गावित यांनी मांडली, तर एका शिक्षणाधिकारीकडे दोन उपशिक्षणाधिकारी यांचे पदभार कसे ? असा प्रश्न भरत गावित यांनी उपस्थित केला, पात्रता नसताना त्यांच्यावर ही जबाबदारी का जिल्ह्यात चारही ठिकाणी अतिरिक्त शिक्षन विभागाचा पदभार सांभाळत आहेत, तर नियमित फक्त दोन ठिकाणीच आहेत वर्ग दोन च्या अधिकाऱ्यांना डावलून वर्ग तीनच्या अधिकाऱ्यांना पदभार दिला जातो याचा खुलासा करण्याची मागणी स्थायी समिती सदस्य भरत गावित यांनी केली, तर शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ याचा अहवाल सादर करावा, अशी मागणी केली, तर नंदूरबार जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा पदभार तक्रारी असलेल्या अधिकारी यांच्याकडे कारभार
 का ? याचा खुलासा करावा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा पदभार हा सक्षम अधिकाऱ्याकडे सोपविण्याची मागणी जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य भरत गावित यांनी केला.

शासनाला विनंती आहे की, नंदुरबार जिल्हा परिषदेतील रिक्तपदे भरण्यात यावी. ज्यामुळे जिल्ह्यात विकासाला चालना मिळेल तसेच ग्रामीण भागातून आलेल्या नागरीकांचे तक्रारी सोडविण्यास मदत होईल. आज जिल्हा परिषदेत पात्रता नसतांनाही विविध विभागात कर्मचार्‍यांना अधिकारीपदाचा दर्जा दिला जात आहे. त्यातच शिक्षण विभागात मनमानी कारभार सुरू असून अनेक कर्मचारी 10 ते 12 वर्षापासून एकाच ठिकाणी तळ ठोकून आहे. अशा कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी.
         भरत गावीत , जि.प.सदस्य

Post a Comment

0 Comments

|