Header Ads Widget


Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात

 Dhananjay Munde Car Accident : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) 



यांच्या कारला रात्री 12.30 वाजता अपघात झाला. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि ग्रामस्थांच्या भेटी घेऊन ते परळीकडे परत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात परळी शहरात झाला. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती देण्यात आली आहे. (NCP leader Dhananjay Munde's car accident in Parli)

कारला अपघात झाल्याची माहिती ट्विट करुन धनंजय मुंडे यांनी दिली आहे. माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी ट्विट करताना केले आहे.

काल धनंजय मुंडे हे परळी येथे अनेक कार्यक्रमानिमित्ताने गेले होते. मंगळवारी मतदारसंघातील दिवसभराचे कार्यक्रम आणि सभा उरकून परळीला परतत होते. यावेळी रात्री 12.30 वाजता चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि मुंडे यांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारानंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Post a Comment

0 Comments

|