Header Ads Widget


पोलीस भरतीसाठी निर्देश नसल्याने तृतीयपंथी चांद तडवी यास नकार..


निर्देश नसल्याने पोलीस भरतीसाठी तृतीयपंथीयास नकार


धुळे ! Dhule/LivenationNews 



पोलिस दलाच्या  इतिहासात प्रथमच तृतीयपंथी  उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने त्यांच्यासाठी नेमके इव्हेंट कुठले असतील, शारिरीक चाचणी कशाप्रकारची असेल, धावण्याच्या स्पर्धेसाठी किती अंतराची मर्यादा असेल, गोळाफेक आणि इतर इव्हेंटसाठी काय निकष असतील हे स्पष्ट नसल्याने तृतीयपंथी चांद तडवी यांना पोलीस भरतीसाठी थांबविण्यात आले. अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख संजय बारकुंड यांनी दिली.


पोलिस भरतीच्या शेवटच्या दिवशी महिला उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी आणि चाचणी घेण्यात आली. पोलिस भरतीतील नियमावली प्रमाणे तृतीयपंथी उमेदवार चांद तडवी यांना आज महिला भरतीच्या वेळी बोलविले होते. त्यामुळे चांद तडवी भरतीसाठी पहाटे 5 वाजताच पोलिस कवायत मैदानावर दाखल झाल्या. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली गेली. त्यानंतर सकाळी 7 वाजता शारिरीक चाचणीसह धावणे, गोळाफेक या इव्हेंटसाठी त्या तयार असतानाच चांदला थांबविण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय असला तरी पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने त्यांच्यासाठी नेमके इव्हेंट कुठले असतील, शारिरीक चाचणी कशाप्रकारची असेल, धावण्याच्या स्पर्धेसाठी किती अंतराची मर्यादा असेल, गोळाफेक आणि इतर इव्हेंटसाठी काय निकष असतील हे स्पष्ट नसल्याने चांदला थांबविण्यात आले. तुमचे ग्राऊंड होणार नाही हेे पोलिसांनी चांदला सांगितले. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शासन स्तरावर इव्हेंटबाबत निर्णय होवू शकतात. त्यामुळे तुर्त थांबा असे पोलिसांनी स्पष्ट केले.

शासन निर्णयामुळे पोलिस भरतीसाठी आलेले तृतीयपंथी चांद हे काहीसे नाराज झाले. त्यांची समजूत जिल्हा पोलिस प्रमुख संजय बारकुंड यांनी काढली. तुम्हाला नकार देण्यात आलेला नाही. नियमावली जाहीर झाल्यानंतर इव्हेंट ठरल्यानंतर पुन्हा बोलविले जाईल. संधी मिळेल. त्यामुळे घाबरु नका, चांगली प्रॅक्टीक्स करा, चांगला अभ्यास करा असा आधार त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments

|