नंदुरबार दि : 12/01/2023 : जिल्हा लागत असलेल्या गुजरात राज्यासह संपुर्ण भारतात मकरसंक्रांतीचा पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पतांगोत्सावाचा आनंद घेण्यासाठी लहानांपासुन थोरल्यांपर्यत सर्वच नागरिक घेत असतात. जिल्ह्यतील विविध शहरांमध्ये पतंग व मांजा विक्रेत्यांनी आप-आपली दुकाने मांडलेली असतात. पतंगोत्सव साजरा करतांना डी.जे. व स्पिकर लावुन मोठ-मोठ्याने गाणे लावुन नृत्य करतांना आपण बघत असतो, परंतु सण साजरा करुन आपली संस्कृती टिकवत असतांना पर्यावरणाची काळजी व सांभाळ करणे हे देखील सर्व सामान्य नागरीकांचे एक कर्तव्य आहे. पतंगोत्सव साजरा करतांना नायलॉन मांजा वापरामुळे निसर्गातील बरेच पशु, पक्षी वेळप्रसंगी लोकांना दुखापत होवुन आपला जिव देखील गमवावा लागला आहे, असे अनेक उदाहरण आपण वर्तमानपत्र किंवा प्रसारमाध्यमांद्वारे बघत असतो. अशा प्रकारच्या पतंग उडविण्याच्या धाग्यामुळे प्राणघातक इजांपासुन पक्षी व मानव जिवितांस सरंक्षण करण्याची गरज आहे.अशा दुर्मिळ व नष्टप्राय होत असलेल्या निष्पाप पक्षांचे सरंक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.
नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांनी वेळोवेळी कृत्रीम वस्तूपासुन बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याचा सणाच्या वेळी बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच नायलॉन मांजाची किरकोळ विक्री किंवा प्रमुख विक्रेत्याचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्यात येईल असे आवाहन केले होते. तरी देखील नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुध्द नंदुरबार जिल्हा घटकात नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे 04 गुन्हे, उपनगर पोलीस ठाणे येथे 01 गुन्हे, शहादा पोलीस ठाणे येथे 02 गुन्हे, तळोदा पोलीस ठाणे येथे 02 गुन्हे असे एकुण 09 नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करून 31,090/- रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलेला आहे.
पतंग उडवितांना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जिवीत हानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, प्लॅस्टीक किंवा तर कृत्रीम वस्तूपासुन बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याचा सणाच्या वेळी बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच नायलॉन मांजाची किरकोळ विक्री किंवा प्रमुख विक्रेत्याचा शोध घेवुन त्यांचेवर पर्यावरण (सरंक्षण) अधिनियम 1986 च्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल. त्याचप्रकारे ज्या वस्तूंपासुन पर्यावरणास हानी पोहचेल असेल असे नायलॉन मांजाची विक्री, साठवणुक किंवा हाताळणी करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल तसेच नायलॉन मांजा विक्री व हाताळणी करतांना आढळुन आल्यास त्वरीत नंदुरबार जिल्हा पोलीस घटकात खालील प्रमाणे तयार करण्यात आलेले कारवाई पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार 02564-210100/210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी केलेले आहे.
0 Comments