Header Ads Widget


मकर संक्रांति काय, त्याचे महत्व उद्देश थोडक्यात

आपल्या देशात दरवर्षी खूप सारे सण साजरे केले जातात. सणांमुळे लोकामध्ये एकतेची भावना व आनंद वाढतो. भारताच्या प्रमुख सणापैकी मकर संक्रांत हा एक सण आहे. हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. या दिवसाला एक दुसऱ्याला तिळगुळ देऊन साजरे केले जाते. मकरसंक्रांत हा सण भारतासह नेपाळ, बांगलादेश आणि जगभरात जिथे कुठे हिंदू धर्माचे लोक राहतात तेथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी हा सण विशेष असतो कारण यादरम्यानच शेतातील पिक कापले जाते. 

संक्रांत ही सूर्याच्या उत्तरायण होण्याने साजरी करतात. उत्तरायण हे देवतांचे अयन असते. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला 'मकर संक्रांत' पण म्हटले जाते. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. मकर संक्रांती नंतर दिवस मोठे व रात्र लहान होत जातात. आपल्या देशात वेगवेगळ्या सणाना वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी देखील तिळगुळ बनवून खाल्ले जाते. या दिवशी लहान मोठे सर्वच जण तिळगुळ वाटप करतात. तिळगुळ देताना "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला" असे देखील म्हटले जाते. थंडीच्या दिवसात तीळ गुळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते. या दिवशी लहान मुले आई वडील तसेच मोठ्याचा आशीर्वाद प्राप्त करतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी उडवण्याचे देखील महत्त्व आहे. विशेष करून गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये पतंग उडवली जाते. या दिवशी पतंग उडवणे मागे करमणूक हा उद्देश असला तरी थंडीच्या दिवसात पतंग उडवल्याने शरीराला सूर्याची उष्णता मिळून डी जीवनसत्व प्राप्त होते. यामुळे डी जीवनसत्व अभावी होणाऱ्या शारीरिक समस्यांपासून आपण दूर राहू शकतो.

Live Nation Newsचे सर्व प्रेक्षकांना मकरसंक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा..💐

Post a Comment

0 Comments

|